अखंड शिवनाम सप्ताहात परमरहस्य पारायण सोहळ्यास प्रतिसाद ...

श्री शनैश्वर जन्मोत्सव व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी श्री शनी मंदिरात रक्तदान शिबीर 



परळी वैजनाथ दि.१२ (प्रतिनिधी)

         श्री शनी मंदिरात रविवार (दि.१०) पासून श्री शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 

या सप्ताहात गुरुवारी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरास सहभागी होवून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

          बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या श्री शनी मंदिरात दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी श्री शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त अखंड शिवनाम सप्ताह व परमरहस्य पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून गुरुवारी (दि.१४)  धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन सकाळी आठ ते बारा करण्यात आले आहे. तसेच बुधवारी (दि.१३) शांभवी  क्लिनीकल लॅबच्या वतीने मोफत रक्ततपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री शनी मंदिर देवस्थान ट्रस्ट, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, शनैश्वर प्रतिष्ठान, तेली युवक संघटना, शनैश्वर महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

----------------------------------------------------------

  अखंड शिवनाम सप्ताहात परमरहस्य पारायण सोहळ्यास प्रतिसाद 

         श्री शनी मंदिरात आयोजित अखंड शिवनाम सप्ताह व परमरहस्य पारायण सोहळ्यास महिला व पुरुष भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून वैद्यनाथ मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. 

--------------------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार