संतापजनक घटना

इमेज
  साडेतीन वर्षाच्या बालिकेवर ६५ वर्षीय वृद्धाचा अत्याचाराचा प्रयत्न केज तालुक्यातील काळेगाव (घाट) येथे एका ६५ वर्षीय नराधमाने साडेतीन वर्षांच्या चिमुरडीला घरात कोंडून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. ही घटना १२ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. पीडित मुलीची आई कामावर गेलेली असताना, संशयित आरोपीने चिमुरडीच्या पाच वर्षांच्या भावाला खाऊचे आमिष दाखवून दुकानात पाठवले आणि त्यानंतर मुलीला आपल्या घरात बोलावून दरवाजा आतून बंद केला. काही वेळाने मुलगा दुकानातून परत आल्यावर बहीण न दिसल्याने त्याने घरात असलेल्या आजारी वडिलांना याची माहिती दिली. वडिलांनी शोध घेतला असता शेजाऱ्याचे घर बंद असल्याचे पाहून त्यांना संशय आला. आवाज देऊन घर उघडले असता संशयित आरोपी आणि मुलगी घरात मिळून आले. यावेळी नराधमाने मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. या घटनेनंतर नातेवाईकांनी तातडीने केज पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. याप्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोल...

परिपूर्ण अर्ज सादर करण्याचे आवाहन.....

 जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्यास 19 मेपर्यंत मुदतवाढ



बीड | प्रतिनिधी

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, बीड यांच्या वतीने सन 2020-21, 2021-22 आणि 2022-23 या वर्षांकरिता देण्यात येणाऱ्या जिल्हा क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज सादर करण्याची मुदत आता 19 मे 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. प्राप्त प्रस्तावांना अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने ही मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. अरविंद विद्यागर यांनी दिली.

जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचा गौरव व्हावा तसेच त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने शासनाच्या जिल्हा क्रीडा पुरस्कार नियम 2020 व 2022 नुसार हे पुरस्कार दिले जाणार आहेत. यामध्ये 01 गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, 01 पुरुष खेळाडू, 01 महिला खेळाडू आणि 01 दिव्यांग खेळाडू अशा एकूण चार पुरस्कारांचा समावेश आहे.

सन 2020-21 पुरस्कारासाठी 1 जुलै 2020 ते 30 जून 2021, सन 2021-22 पुरस्कारासाठी 1 जुलै 2021 ते 30 जून 2022 आणि सन 2022-23 पुरस्कारासाठी 1 जुलै 2022 ते 30 जून 2023 हा कालावधी ग्राह्य धरण्यात येणार आहे. खेळाडूंसाठी मागील पाच वर्षांतील तर क्रीडा मार्गदर्शकांसाठी मागील दहा वर्षांतील कामगिरीचा विचार केला जाणार आहे.

गुणवंत खेळाडू पुरस्कारासाठी अर्जदाराने संबंधित पुरस्कार वर्षासह मागील पाच वर्षांपैकी किमान दोन वर्षे जिल्ह्याचे अधिकृत स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व केलेले असणे आवश्यक आहे. राज्य, राष्ट्रीय, शालेय व केंद्र शासन आयोजित स्पर्धांमधील उत्कृष्ट कामगिरीचा विचार करण्यात येणार असून स्पर्धांची प्रमाणपत्रे सादर करणे बंधनकारक राहणार आहे. अर्ज संबंधित अधिकृत जिल्हा संघटनेमार्फत सिफारस करून सादर करणे आवश्यक असून अपवादात्मक परिस्थितीत वैयक्तिक अर्जही स्वीकारले जाणार आहेत.

तसेच एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, जागतिक चषक, युथ ऑलिंपिक, युथ कॉमनवेल्थ आदी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी खेळाडूंना संबंधित पुरस्कार वर्षासाठी थेट जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी अर्जदाराने महाराष्ट्रात सलग दहा वर्षे क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केलेले असावे तसेच संबंधित पुरस्कार वर्षात त्यांचे वय 35 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पदकविजेते खेळाडू घडविणाऱ्या मार्गदर्शकांना अर्ज करता येणार आहे.अधिक माहितीसाठी श्री. अनिकेत काळे, क्रीडा अधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बीड यांच्याशी 9604959678 या क्रमांकावर संपर्क साधावा.

विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बीड येथे उपलब्ध असून पात्र खेळाडू व मार्गदर्शकांनी परिपूर्ण अर्ज 19 मे 2026 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांच्यावतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....