दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS:सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक श्रीराम सपकाळ यांचे निधन

 सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक श्रीराम सपकाळ यांचे निधन



अंबाजोगाई : सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक श्रीराम सपकाळ यांचे आज गुरूवारी (दि.२२) सकाळी ८ वाजता औरंगाबाद येथील खाजगी रूग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७० वर्षे होते.

श्रीराम सपकाळ हे १९८२-८५ या कालावधीत अंबाजोगाईत पोलीस ठाणे प्रमुख होते. त्या काळात त्यांचे अंबाजोगाईशी कायमचे ऋणानुबंध जोडले गेले. अंबाजोगाईत त्यांचा मोठा मित्र परिवार आहे. त्यानंतर त्यांनी वसमत, नागपूर, जळगाव, अहमदनगर कर्तव्य बजावले. २००९ साली ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर ते औरंगाबाद येथे स्थायिक झाले होते. काही दिवसापूर्वी त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे औरंगाबाद येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे आज गुरूवारी सकाळी ८ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. सोलापूरचे जिल्हा कृषी अधिकारी उमेश बिराजदार, पालघरचे जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि औरंगाबाद येथील कंत्राटदार प्रवीण चव्हाण यांचे ते सासरे होत. कै. श्रीराम सपकाळ यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी टाकळी (ता. कन्नड, जि. औरंगाबाद) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

टिप्पण्या

  1. श्री.सपकाळसाहेब मानवत येथे तेव्हापासून त्यांचे माझे मित्रत्वाचे संबंध होते.त्यानंतर त्यांनी बीड शहर पोलिस स्टेशन आणि अंबाजोगाई येथे काम केले. त्यांचा कार्यकाल अविस्मरणीय होते
    समाजातील सर्वस्तरात त्यांचे सोहार्दपूर्ण संबंध होते. सेवानिवृत्तीनंतर तत्यांचु अनेकवेळा भेट झाली. फोनद्वारे संपर्क होता. पोलिसवर्दीतील या सन्मित्रास आम्ही मुकलोय आहोत
    त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. सपकिळसाहेब आपण सदैव‌स्मरणात रहाला
    ओम शांती
    अशोक देशमुख

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट