मोठी बातमी.....मोठी घडामोड

इमेज
स्व.विलास घुले खून प्रकरण: दहाव्या आरोपीला एसआयटीने केली अटक   केज :- प्रतिनिधी... बीड जिल्ह्यातील टाकळी ता. केज येथील स्व. विलास घुले खून प्रकरणात आणखी एका आरोपीला रविवारी लातूर येथून अटक करण्यात आली आहे. आता एकूण दहा आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. स्व. विलास घुले खून प्रकरणी रामेश्वर गायकवाड, बाबासाहेब कदम, मंगेश कदम, संतोष कदम, सूरज उर्फ भैय्यासाहेब कदम, शुभम गायकवाड, नवनाथ कदम, दीपक कदम, अजय कदम या नऊ जणां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणात एसआयटीच्या पथकाने राजकुमार मोरे (रा. सोनीजवळा ता. केज) यास लातूर येथून रविवारी दुपारी अटक केली आहे.  या खून प्रकरणात आता एकूण दहा आरोपींना अटक करण्यात आली असल्याने खळबळ उडाली आहे. टाकळी येथे कँडल मार्च काढला :-  स्व. विलास घुले यांच्या घरापासून रविवारी सायंकाळी ७ वाजता कँडल मार्चला सुरुवात झाली. ज्या ठिकाणी घुले यांची हत्या झाली, या घटनास्थळापर्यंत हा कँडल मार्च काढण्यात आला. कँडल मार्चमध्ये घुले कुटुंब, गावातील महिला व पुरुष हातात पेटत्या मेणबत्त्या घेऊन सहभागी झाले होते.  दोघांच्या पोलीस कोठडीत व...

MB NEWS-पूरग्रस्तांना मदत करून पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस होणार

  पूरग्रस्तांना मदत करून पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस होणार



परळी । दिनांक २५। 

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस राज्यातील विविध भागांतील पूरग्रस्तांना मदत करून साजरा करण्यात येणार आहे.  

पंकजाताई मुंडे यांचा उद्या २६ जुलै रोजी वाढदिवस आहे. कोरोना महामारीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला, अशा परिस्थितीत  वाढदिवस साजरा करणे आपल्या मनाला पटत नाही, त्यामुळे वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय पंकजाताई मुंडे यांनी अगोदरच घेतला होता. वाढदिवसाच्या दिवशी सामाजिक उपक्रम राबवून गरजूंना मदत करावी असे आवाहनही त्यांनी केले होते.राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, चिपळूण आदी भागात नुकत्याच झालेल्या महापुरामुळे हजारो लोक बेघर झाले आहेत. जिवित व मालमत्तेचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. अशा  संकटात लोकांना आज मदतीची गरज आहे, त्यामुळे वाढदिवस साजरा न करता त्याच्या विविध कार्यक्रमांवर होणारा खर्च टाळून जमा झालेला सर्व निधी पंकजाताई मुंडे यांचेकडे सुपूर्द करून पूरग्रस्तांना वस्तू स्वरूपात मदत करण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. याच अनुषंगाने शहरात  मदतफेरी देखील काढण्यात येणार आहे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या