पोस्ट्स

जून २८, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
महिला महाविद्यालयात स्वामी विवेकानंद पुण्यतिथी साजरी  परळी वैजनाथ,प्रतिनिधी     येथील कै .लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात आज दि . ४. ७ . २६ रोजी स्वामी विवेकानंद यांची पुण्यतिथी राष्ट्रीय सेवा योजना विभागद्वारा साजरी करण्यात आली .     आरंभी संस्थेचे अध्यक्ष मा संजय देशमुख , कोषाध्यक्ष प्रा प्रसाद देशमुख व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ विद्याताई देशपांडे आदी मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . याप्रसंगी रासेयो विभागाचे डॉ . पी .व्ही गुट्टे सरानी स्वामी विवेकानंदांच्या कार्याचा विस्तृत आढावा घेतला .       या कार्यक्रमासाठी संस्थेच्या संचालिका सौ छायाताई देशमुख महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ विद्या देशपांडे यांच्यासह प्रा डॉ . अरुण चव्हाण डॉ राजश्री कल्याणकर . डॉ विलास देशपांडे डॉ राजकुमार यल्लावाड डॉ . रंजना शहाणे डॉ . विद्या गुळभिले डॉ. वाघमारे सर  डॉ जोशी सर, प्रा डॉ संगिता कचरे आदि मान्यवरांची उपस्थिती होती .
इमेज
पैलवान सुमित भारस्कर एशियन चॅम्पियन : बीडच्या मल्लांने गाजवले थायलंडचे मैदान  माजलगाव्र तिनिधी) युनायटेड वर्ल्ड रेसलिंग यांच्या वतीने पटाया थायलंड येथे ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धा सुरू आहे. भारतीय कुस्ती संघ या स्पर्धेत सहभागी झाला आहे. देशाचे प्रतिनिधित्व करत असलेला महाराष्ट्रातील पैलवान सुमित आप्पासाहेब भारस्कर याने 70 किलो वजन गटामध्ये (फ्रिस्टाईल) सुवर्णपदक प्राप्त केले आहे.       सुमित, रुस्तम ए हिंद व महाराष्ट्र केसरी पै. अमोल बुचडे यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती अकादमी मारुंजी जिल्हा पुणे येथे ६ वर्षांपासून सराव करत आहे. पटाया थायलंड येथील सुरू असलेल्या स्पर्धेत सुमित 70 किलो वजन गटामध्ये भारतीय कुस्ती संघात निवड होऊन देशाचे प्रतिनिधित्व करत आहे. सुमितची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. ऑलिम्पिकमध्ये जास्तीत जास्त पदके जिंकण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने 'मिशन लक्ष्यवेध' (Mission Lakshyavedh) अंतर्गत हाय परफॉर्मन्स सेंटर्स (High Performance Centres) सुरू केली आहेत. या केंद्रांमध्ये खेळाडूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण, आहार आणि आधु...

पंकजा मुंडे यांनी दिल्लीहून दूरध्वनीवरून साधला संवाद

इमेज
  राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी गोपीनाथगडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे घेतले दर्शन पंकजा मुंडे यांनी दिल्लीहून दूरध्वनीवरून साधला संवाद परळी वैजनाथ, प्रतिनिधी :      राजमाता श्रीमंत कल्पनाराजे भोसले यांनी गोपीनाथ गड येथे भेट देऊन स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी समाधीस्थळी पुष्प अर्पण करून लोकनेते मुंडे यांच्या कार्याला अभिवादन केले.        राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या स्वागतासाठी स्थानिक भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. दरम्यान, राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या दिल्ली दौऱ्यावर असल्यामुळे त्या प्रत्यक्ष उपस्थित राहू शकल्या नाहीत. मात्र, त्यांनी दूरध्वनीवरून राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्याशी संवाद साधून त्यांच्या गोपीनाथ गड भेटीबाबत आनंद व्यक्त केला तसेच शुभेच्छाही दिल्या. या प्रसंगी उपस्थितांनी राजमाता कल्पनाराजे भोसले यांचे स्वागत केले. ना.पंकजाताईंनी साधला फोनवरून संवाद    ना. पंकजाताई मुंडे हया नवी दिल्लीत असल्याने त्यांनी...
इमेज
व्हीआयपी प्रोटोकॉल बाजूला ठेवत सुनेत्रा पवार वारकऱ्यांच्या पंगतीत पंढरपूर, : आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या साधेपणाची आणि वारकरी परंपरेप्रती असलेल्या आदराची प्रचिती घडवली. पंढरपुरातील नव्याने उभारण्यात आलेल्या वारकरी भक्त निवासाच्या उद्घाटन सोहळ्यानंतर त्यांनी कोणताही व्हीआयपी प्रोटोकॉल न स्वीकारता थेट सामान्य वारकऱ्यांच्या पंगतीत बसून महाप्रसादाचा आस्वाद घेतला. त्यांच्या या अनपेक्षित आणि साध्या कृतीने उपस्थित वारकरी, नागरिक आणि मान्यवरांचे लक्ष वेधून घेतले. उद्घाटन समारंभानंतर स्वतंत्र भोजन व्यवस्था उपलब्ध असतानाही सुनेत्रा पवार यांनी ती नाकारत वारकऱ्यांमध्येच स्थान घेतले. इतर भाविकांप्रमाणेच त्या पंगतीत बसल्या आणि सर्वांसोबत प्रसादाचे जेवण केले. या वेळी कोणताही विशेष लवाजमा किंवा वेगळी व्यवस्था न ठेवता त्यांनी वारकरी परंपरेचा सन्मान राखत सर्वसामान्य भाविकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या शेजारी बसलेल्या अनेक वारकऱ्यांनी त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. काहींनी वारीतील अनुभव सांगितले, तर काहींनी शासनाकडून मिळणाऱ्या ...
इमेज
  उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन पंढरपूर  :- राज्याचे  उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार   यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.यावेळी मंदिर समितीच्या वतीने  मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.               यावेळी  आमदार दिलीप वळसे पाटील,  नगराध्यक्षा प्रणिती भालके,मंदिर समितीचे सदस्य शकुंतला नडगिरे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन, जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, प्रांताधिकारी सचिन इथापे,मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत ढगळे, मुख्याधिकारी महेश रोकडे,  व्यवस्थापक प्रवीणकुमार घम तसेच मान्यवर पदाधिकारी  उपस्थित होते. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन विकास आराखड्या अंतर्गत सुरू असलेल्या काम...

परळीकरांच्या वतीने आत्मीय स्वागत!!!!

इमेज
  राजमाता श्रीमंत कल्पनाराजे भोसले यांनी परळीत घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन परळी वैजनाथ | प्रतिनिधी...        सातारा संस्थानच्या राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी शनिवारी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे मनोभावे दर्शन घेऊन विधिवत पूजा-अर्चा केली.       खा.उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री राजमाता कल्पनाराजे भोसले या मराठवाडा दौऱ्यावर आल्या होत्या. त्यानिमित्त त्यांनी परळी वैजनाथ येथे येऊन प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेत श्रद्धाभावाने पूजा केली. यावेळी परळीकरांच्या वतीने त्यांचे आत्मीय स्वागत करण्यात आले. परळी नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांनी तमाम परळीकरांच्या वतीने त्यांचे स्वागत केले. तसेच वैद्यनाथ देवस्थान समितीच्या वतीने सचिव राजेश देशमुख यांनी प्रभू वैद्यनाथाची प्रतिमा व मानाचे उपरणे देऊन त्यांचा सत्कार केला.        यावेळी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचे अध्यक्ष नितीन चौगुले,नगरसेविका अंजली माळी, माजी नगरसेवक राजेंद्र सोनी, रमेश चोंडे, गणेश कराड, नितीन समशेट्टे, अश्विन मोगरकर,...

दुर्दैवी घटना....कुटुंबाचा आधार गेला !

इमेज
पेरणीसाठी अर्थिक विवंचनेतील तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या केज :- प्रतिनिधी... पेरणीसाठी पैसे नसल्याने हताश झालेल्या एका २६ वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोरडेवाडी ता. केज येथे घडली आहे.  केज तालुक्यातील डोंगरी भागात असलेल्या कोरडेवाडी येथील तरुण शेतकरी बाबू सुभाष यादव वय (२६ वर्ष) या शेतकऱ्याच्या नावावर २ हेक्टर २० आर जमीन आहे. मागील आठवड्या पासून पाऊस पडू लागल्याने शेतकरी पेरणी करू लागले आहेत. बाबू यादव यांनी जवळ असलेल्या पैशातून थोडी फार पेरणी केली. मात्र पूर्ण शेताची पेरणी करण्यासाठी त्याच्या जवळ पैसे नसल्याने ते हताश झाले होते. पेरणी वेळेवर न झाल्यास शेती पडीक राहील, या विचाराने आलेल्या नैराश्यातून बाबू यादव यांनी टोकाची भूमिका घेऊन १ जुलै रोजी सकाळी १०:३० वा.च्या सुमारास शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले.  या घटनेची माहिती मिळताच जमादार पुरुषोत्तम शेप, पोलीस नाईक गोरख फड यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. दरम्यान, या घटनेची केज पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती. मयत ...

ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथक घटनास्थळी.

इमेज
  ट्रेझरीच्या लेखापालचे घर फोडून पावणेदोन लाखाचा ऐवज लंपास केज:- वडील आजारी असल्याने त्यांना उपचारासाठी दवाखान्यात घेऊन गेल्याची संधी साधून चोरट्यांनी ट्रेझरीत कनिष्ठ लेखापाल असलेल्या कर्मचाऱ्याचे घर चोरट्यांनी फोडून पावणेदोन लाखाचा ऐवज लंपास केला आहे. केज तालुक्यातील तांबवा येथील महादेव नारायण परळकर हे अंबाजोगाई येथील ट्रेझरी कार्यालयात कनिष्ठ लिपिक म्हणून सेवेत आहेत. त्यांचे वडील नारायण परळकर यांना पॅरालिसीस झाल्याने त्यांना दि. २७ जून रोजी उपचारासाठी विवेकानंद हॉस्पीटल लातुर येथे ॲडमिट केले असल्याने त्यांच्या कुटुंबातील सर्वजण हे तांबवा येथील त्यांच्या राहत्या घराला कुलुप लावुन लातुर येथे गेले होते. दि. १ जुलै रोजी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरा शेजारी रहात असलेल्या त्रिशाला भिमराव ओव्हाळ या महिलेने त्यांना फोन करुन सांगीतले की, त्यांच्या घराचा दरवाजा उघडा आहे. माहिती मिळताच महादेव परळकर हे गावी आले. त्यावेळी त्यांनी पाहीले असता घराचे दरवाजा उघडा दिसला व घराचे दरवाज्याला लावलेले कुलुप खिडकीत बाजुला ठेवलेले दिसले. त्यांनी घरात जावुन पाहीले असता कपाट व पेट्यातील स...

शेतातील विद्युत मोटारी आणि वायर चोरीच्या घटनांमध्ये वाढ....

इमेज
पावसाने अडवलं... अन् चोरांनी लुबाडलं! गोवर्धन शिवारातून बोरवेलची ५ एचपी मोटार व वायर चोरी; पिके वाचविण्याचाच आधार हिरावला परळी वैजनाथ, प्रतिनिधी :       परळी वैजनाथ तालुक्यातील गोवर्धन येथील ७५ वर्षीय शेतकरी अनंत रंगनाथ जाधव यांच्यावर दुहेरी संकट कोसळले आहे. एकीकडे पावसाने दडी मारल्याने पिकांना जगविण्यासाठी विहीर व बोरवेलच्या पाण्यावर अवलंबून राहण्याची वेळ आली असताना, दुसरीकडे अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शेतातील बोरवेलची ५ एचपीची मोटार आणि वीज वायर चोरी करून नेल्याने पिके वाचविण्याचाच आधार हिरावला गेला आहे.         गोवर्धन शिवारातील 'चोपन' नावाच्या शेतातून जीके एनर्जी लिमिटेड कंपनीची ५ एचपीची मोटार व वीज वायर २३ ते २४ जूनच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर अनंत जाधव यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला, मात्र मोटार व वायरचा कोणताही मागमूस लागला नाही.अखेर २ जुलै रोजी त्यांनी सिरसाळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक १९२/२०२६ अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

८ व ९ जुलै... दोन दिवस पालखी परळीत.,......

इमेज
  श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे 9 जुलै रोजी परळी शहरात आगमन ; दि.8 जुलै 2026 थर्मल कॉलनीत मुक्काम  परळी वैजनाथ (प्रतिनिधी)ः-शेगांव संस्थान येथील श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे गुरुवार दि.9 जुलै 2026 रोजी परळी शहरात आगमन होणार आहे.   शेगांव येथुन पंढरपुरकडे निघालेल्या श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे परळी व पंचक्रोशितील भक्तभावीक मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. 21 जून 2026 रोजी श्रींचे पालखीचे शेगांव येथून प्रस्थान झाले असुन दि.8 जुलै 2026 बुधवार रोजी रात्री थर्मल कॉलनी परळी वैजनाथ येथे मुक्काम पालखीचा राहणार असुन गुरुवार दि.9 जुलै 2026 रोजी श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे परळी शहरात आगमन होत आहे. ही पालखी शहरातील अग्रवाल लॉज, मोंढा मार्केट, राणी लक्ष्मीबाई टॉवर, नेहरू चौक मार्गे जगमित्र नाना मंदिर ह्या मुख्य रस्त्यावरुन जात असतांना भाविक मोठ्या श्रद्धेने श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे भक्तीभावाने दर्शन घेतात. गुरुवार दि.09 जुलै 2026 रोजी सकाळी 6.30 वाजता उड्डाणपुलावर या पालखीचे स्वागत होणार आहे. ज्या भाविकभक्तांना देणगी द्यावयाची आहे त्यांची देणगी...

शिक्षकांवरचा भार कमी....अध्यापन कार्यही होणार सुरळीत!

इमेज
मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण : आता बिएलओंना सहाय्यक म्हणून शिक्षकां शिवाय इतर शासकीय / निमशासकीय कर्मचारी नियुक्त  एमबी न्यूज ने शाळांचा विषय आणला होता ऐरणीवर  परळी वैजनाथ, प्रतिनिधी :      राज्यभर सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेसाठी शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर नियुक्ती करण्यात आल्याने परळी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील अध्यापन व्यवस्था कोलमडल्याचे चित्र दै. पुढारीने समोर आणले होते.त्यानंतर आता या कामासाठी बिएलओंना सहाय्यक म्हणून शिक्षकांशिवाय इतर शासकीय / निमशासकीय कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शाळाही सुरु राहतील व अध्यापन व्यवस्थाही निरंतर चालेल यादृष्टीने या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.         भारत निवडणूक आयोगाने विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केलेला असून त्याअनुषंगाने, परळी वैजनाथ तालुक्यात ही मोहीम सुरु झाली आहे. कामकाज हे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांप्रमाणे दि. ३०/०६/२०२६ ते २९/०७/२०२६ या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्...
इमेज
परळी वैजनाथ:१४ वर्षीय मुलीचा बालविवाह पोलिसांनी रोखला परळी वैजनाथ : प्रतिनिधी...     परळी तालुक्यातील पांगरी तांडा येथे होणारा १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह परळी ग्रामीण पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून रोखला. गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या तातडीच्या कारवाईमुळे नियोजित विवाह रद्द करण्यात आला.       परळी ग्रामीण पोलिसांना गुरुवारी (२ जुलै) दुपारी पांगरी तांडा येथे अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. शिवकर सोळंखे, पोहेकॉ. गजानन पुजरवाड आणि चापोहे. मुंडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक पोलीस पाटील तथा राज्यपाल पुरस्कारप्राप्त ज्ञानोबा (माऊली) मुंडे यांनाही या कारवाईत सहभागी करून संबंधित कुटुंबाची भेट घेण्यात आली. सुरुवातीला मुलीच्या पालकांनी विवाहाबाबत टाळाटाळ केली. मात्र, विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर सायंकाळी विवाह होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पोलिसांनी मुलीच्या जन्मतारखेची कागदपत्रे तपासली असता तिचे वय अवघे १४ वर्षे असल्याचे स्पष्ट झाले.   ...

बिएलओ आणि सहाय्यक म्हणूनही शिक्षकच लावले कामाला....शाळा बनल्या विनाशिक्षक

इमेज
  परळीतील जिल्हा परिषद शाळा 'वाऱ्यावर'; ६२३ पैकी तब्बल ५५० शिक्षक SIR ड्युटीवर  विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम; केवळ ७३ शिक्षकांकडे अध्यापनाची जबाबदारी परळी वैजनाथ, प्रतिनिधी : राज्यभर सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेसाठी शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर नियुक्ती करण्यात आल्याने परळी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील अध्यापन व्यवस्था कोलमडल्याचे चित्र आहे. तालुक्यातील एकूण ६२३ जिल्हा परिषद शिक्षकांपैकी तब्बल ५५० शिक्षकांना बीएलओ (Booth Level Officer) म्हणून मतदार नोंदणी व सखोल पुनरीक्षणाच्या कामावर नियुक्त करण्यात आले आहे. परिणामी, केवळ ७३ शिक्षकांवरच विद्यार्थ्यांच्या अध्यापनाची जबाबदारी येऊन पडली आहे.            भारत निवडणूक आयोगाने विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम महाराष्ट्र राज्यासह १६ राज्य व ३ केंद्रशासित प्रदेशामध्ये घोषित केलेला असून त्याची अंमलबजावणी राज्यात सुरु झालेली आहे. त्याअनुषंगाने, बीड जिल्ह्यात सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये ही मोहीम सुरु झाली आहे. कामकाज हे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांप्रमाणे दि. ३...

मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा उपक्रम

इमेज
  आजपासून वारकऱ्यांच्या 'चरण सेवेला' प्रारंभ: भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची ! मुंबई : दि.१:आषाढी वारीदरम्यान पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांना मोफत आरोग्यसेवा आणि चरणसेवेचा लाभ मिळावा, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील 'चरणसेवा' उपक्रम यंदाही राबविण्यात येत आहे.  राज्यातील ११ जिल्ह्यांतील पालखी मार्गावरील सुमारे ४०० मुक्कामस्थळी हा उपक्रम राबविण्यात येणार असून, १२ हजारांहून अधिक डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय विद्यार्थी आणि स्वयंसेवक वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज राहणार आहेत. वारकऱ्यांच्या पायांवरील ताण कमी करण्यासाठी सुमारे ३ हजार लिटर औषधी आयुर्वेदिक तेलाद्वारे पायांची मालिश, फिजिओथेरपी, प्राथमिक उपचार, वैद्यकीय तपासणी तसेच आवश्यकतेनुसार पुढील उपचारासाठी संबंधित रुग्णालयात संदर्भित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गरजेनुसार रुग्णवाहिका सेवाही सज्ज ठेवण्यात आली आहे. याशिवाय, पालखी मार्गावर ८ आरोग्य जनजागृती रथांच्या माध्यमातून केंद्...
इमेज
  महाराष्ट्र राज्य एस.टी. निवृत्त कर्मचारी संघटनेच्या मराठवाडा प्रादेशिक सचिवपदी हेमंत कुलकर्णी यांची फेरनिवड परळी वैजनाथ | प्रतिनिधी...    महाराष्ट्र राज्य निवृत्त परिवहन कर्मचारी संघटनेच्या नुकत्याच संपन्न झालेल्या केंद्रीय कार्यकारिणी बैठक व वार्षिक अधिवेशनात मराठवाडा प्रादेशिक सचिवपदी परळी वैजनाथ येथील श्री. हेमंत कुलकर्णी यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली. संघटनेच्या वतीने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर पुन्हा एकदा प्रादेशिक सचिव पदाची जबाबदारी सोपविली असून या निवडीबद्दल श्री. कुलकर्णी यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.    याच बैठकीत महाराष्ट्र राज्य निवृत्त परिवहन संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी कमलाकर रोटे (कोल्हापूर), महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी महादेव कुलकर्णी (सांगली), सरचिटणीसपदी सदानंद विचारे (ठाणे), संघटक सचिवपदी प्रभाकर आंबेकर (बीड) तसेच कोषाध्यक्षपदी गणेश वायफळकर (मुंबई) तर छत्रपती संभाजी नगरचे सय्यद हमीद यांची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. याशिवाय इतर पदाधिकाऱ्यांचीही निवड करण्यात आली. ...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्यशासनाचे मुंडेंनी मानले आभार

इमेज
परळी धर्मापुरी रस्त्यावर सिमेंट फॅक्टरी रेल्वे फाटकावर होणार 57 कोटींचा उड्डाणपूल, धनंजय मुंडेंनी दिलेला शब्द पाळला उड्डाण पुलामुळे वाहतूक होणार सुरळीत, धनंजय मुंडेंचा यशस्वी पाठपुरावा मुंबई (प्रतिनिधी) - धनंजय मुंडे यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे परळी वैद्यनाथ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्ग मधील परळी ते धर्मापुरी रस्त्यावरील सिमेंट फॅक्टरी परिसरातील रेल्वे फाटक LC-T24 येथे रेल्वे उड्डाण पूल बांधण्याच्या 56.28 कोटी रुपयांच्या कामास केंद्र सरकारने प्रशासकीय मान्यता दिली असून तातडीने निविदा प्रक्रिया राबविण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.  माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कडे याबाबत यशस्वी पाठपुरावा केला आहे. सिमेंट फॅक्टरी परिसरातील रेल्वे फाटक स्थळी रेल्वे आल्यानंतर अगदी तासनतास वाहतूक ठप्प असायची, तसेच अनेक लहानमोठे अपघात घडत असत. मात्र आता हा प्रकल्प उभारल्याने संपूर्ण वाहतूक सुरळीत होणार आहे.  धनंजय मुंडे यांनी याबाबत नितीन गडकरी यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे विनंती केली होती. दरम्यान हा प्रकल्प मंजूर...

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नवीन मार्गदर्शक तत्वे जारी

इमेज
विधानपरिषदेत विविध आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांवर ना. पंकजा मुंडे यांची अभ्यासपूर्ण उत्तरे पुण्यातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणी  मुंबई, दि. १ :  पुणे शहरातील रेडीमिक्स काँक्रीट (RMC) प्रकल्पांमधून मुठा नदीचे प्रदूषण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे बैठक घेऊन नदी पुनर्जीवन प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) तसेच आरएमसी प्रकल्पांच्या प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या प्रकल्पांवर सातत्याने कारवाई केली जात असून, यापुढेही नियमित बैठका घेऊन परिस्थितीवर लक्ष ठेवले जाईल, असे पर्यावरण मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी सभागृहात सांगितले.    विधानपरिषद सदस्य परिणय फुके यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरील चर्चेत डॉ. नीलम गोऱ्हे, प्रवीण दरेकर आणि विक्रम काळे यांनी सहभाग घेतला, त्यावर उत्तर देताना त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, पुण्यातील १०५ आरएमसी प्रकल्पांपैकी सर्व प्रकल्प बंद करण्यात आलेले नसून, केवळ नियमांचे पालन न करणारे, बेकायदेशीरपणे कार...

मातृभाषेतील शिक्षणामुळे गुणवत्ता निर्माण होते,

इमेज
पालकांनी मुलांना मराठी शाळेतच शिक्षण द्यावे-सेवानिवृत्त शिक्षक संजय देशमुख  सामाजिक बांधिलकी जोपासत संजय देशमुख यांनी केले शैक्षणिक साहित्य वाटप परळी वैजनाथ दि.०१(प्रतिनिधी)       मराठी शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये मातृभाषेतील शिक्षणामुळे गुणवत्ता निर्माण होते, पालकांनी मुलांना मराठी शाळेतच शिक्षण द्यावे असे प्रतिपादन सेवानिवृत्त शिक्षक संजय देशमुख यांनी केले. ते गाढे पिंपळगाव येथील शाळेत आयोजित कार्यक्रमात बोलत होते.           गाढे पिंपळगाव येथील विवेकानंद विद्यालयात सेवानिवृत्त शिक्षक संजय देशमुख यांनी १० वर्षं सेवा केली. त्यानंतर ते माजलगाव येथील सिध्देश्वर विद्यालयातून सेवानिवृत्त झाले होते. त्यांनी नौकरी केलेल्या जुन्या शाळेत सामाजिक बांधिलकी जोपासत वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व शाळेला भेट वस्तू दिल्या. यानिमित्ताने शिक्षकांना भेटण्यासाठी शाळेत माजी विद्यार्थी आले होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात शाळेच्या वतीने मुख्याध्यापक गोपीनाथ सोनवणे व शिक्षकांनी संजय देशमुख यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सपत्न...

मानपान आणि वाहनासाठी छळ.....

इमेज
स्कोर्पिओ गाडीसाठी महिलेचा शारीरिक व मानसिक छळ: परळीत ६ जणांवर गुन्हा परळी वैजनाथ: प्रतिनिधी....      लग्नात योग्य मानपान केला नाही आणि माहेरहून स्कोर्पिओ गाडी साठी १० लाख रुपये आणले नाही म्हणून एका ३० वर्षीय विवाहितेचा छळ केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या ६ जणांविरुद्ध छळ आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम बालाजी आडे (वय ३०, मूळ रा. कोठाळा वंजारवाडी, ता. सोनपेठ, जि. परभणी, सध्या रा. मालेवाडी, ता. परळी) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पती बालाजी मोतीराम आडे, सासू शेषाबाई मोतीराम आडे, सासरे मोतीराम आडे, नणंद शांता बालु जाधव, नंदावा बालु शंकर जाधव आणि सवत मनिषा बालाजी आडे (सर्व रा. वंजारवाडी, ता. सोनपेठ, जि. परभणी) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मानपान आणि वाहनासाठी छळ लग्नात मुलीच्या आई-वडिलांनी सासरच्या लोकांचा व्यवस्थित मानपान केला नाही, या कारणावरून आरोपींनी संगनमत करून विवाहितेला त्रा...
इमेज
  जातीवाचक उल्लेख करून २० वर्षीय तरुणीचा विनयभंग; अट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... बर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबाजोगाई घोलपवाडी ता.अंबाजोगाई येथे एका २० वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध विनयभंगासह अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जून रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास पीडित तरुणी तिच्या घरी असताना आरोपी कैलास तुळशीराम पुरणे (रा. घोलपवाडी, ता. अंबाजोगाई) याने तिचा हात धरून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. उपस्थित नागरिकांना पाहून आरोपीने पीडितेच्या जातीचा उल्लेख करत शिवीगाळ केली. तसेच, या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाला. या प्रकरणी पीडित तरुणीने बर्दापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे तसे...

नियमित प्रशासकीय प्रक्रियेचाच भाग असल्याची बतावणी...

इमेज
  परळी औष्णिक वीज प्रकल्पातील एकाचवेळी १९ अधिकाऱ्यांच्या बदल्या; रिक्त पदांमुळे प्रकल्पाच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह परळी वैजनाथ : परळी येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील कार्यकारी अभियंत्यासह विविध महत्त्वाच्या पदांवरील तब्बल १९ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी जारी करण्यात आल्याने प्रकल्प परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या जागी अद्याप एकाही नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नसल्याने प्रकल्पाच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी, परळी औष्णिक प्रकल्पाच्या भवितव्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.            महानिर्मितीच्या परळी औष्णिक वीज केंद्रात गेल्या काही वर्षांपासून वीज निर्मितीची घट, जुन्या यंत्रणांची अवस्था आणि प्रकल्पाच्या भवितव्याबाबत वेळोवेळी चर्चा होत असतानाच आता मोठ्या प्रमाणावर झालेल्या बदल्यांनी या चर्चेला अधिकच खतपाणी घातले आहे. कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, रसायनशास्त्रज्ञ, सुरक्षा अ...
इमेज
बीड जिल्ह्यातील शाळा उद्यापासून नियमित वेळेत; उन्हाची तीव्रता कमी झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा आदेश बीड:चालू आठवड्यात झालेल्या पावसामुळे उन्हाची तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळा उद्यापासून (१ जुलै २०२६) पूर्ववत नियमित पूर्ण वेळ भरवण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी दिले आहे. शाळा पूर्ण वेळ होणार: १ जुलै २०२६ पासून जिल्ह्यातील सर्व शाळा नियमित पूर्ण वेळेत सुरू होतील.वातावरणातील बदल आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे उन्हाचा कडाका कमी झाला आहे. दि. २३ ते २९ जून दरम्यान सकाळच्या सत्रामुळे (सकाळी ८:०० ते १२:३०) कमी झालेल्या तासिकांची भरपाई पुढील काळात केली जाईल. शिक्षण हक्क अधिनियम (RTE) २००९ नुसार हे अध्यापनाचे तास भरून काढले जातील. यापूर्वी अल निनोच्या प्रभावामुळे जिल्ह्यात उन्हाची तीव्रता कायम होती. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने शाळांच्या वेळेत कपात केली होती. आता हवामानात सुधारणा झाल्याने शाळा पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्...

केंद्र सरकारच्या मदतीने सर्वांची सुरक्षित सुटका करण्याची मुंडेंची विनंती...

इमेज
नोकरीच्या आमिषाने म्यानमार मध्ये ओलिस ठेवलेल्या बीड जिल्ह्यातील तरुणासह महाराष्ट्रातील तरुणांची सुटका करा - धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी तरुणांना फसवून मानवी तस्करी करणाऱ्या महाराष्ट्रातील एजंटांच्या जाळ्याचा शोध घेऊन कठोर कारवाई करा मोठ्या पगाराचे आमिष दाखवत तरुणांची आंतरराष्ट्रीय तस्करी आणि जबरदस्तीने सायबर गुन्हे घडवणारे रॅकेट मुंबई (प्रतिनिधी) - बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील नांदूर घाट येथील रहिवासी स्वप्नील काळुंके यांसह अनेक तरुणांना मोठ्या पगाराचे आमिष दाखवून म्यानमार - थायलंड सीमेवर एका छळ छावणीत ओलिस ठेऊन त्यांच्या कडून जबरदस्तीने सायबर गुन्हे घडवले जात असल्याचे समोर आले असून, या प्रकरणी राज्य शासनाने गंभीर दखल घेत केंद्र सरकारच्या मदतीने या सर्व तरुणांची सुखावून सुटका करावी, अशी मागणी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी लेखी पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री महोदयांची विधानभवन येथे भेट घेत विनंतीचे पत्र दिले आहे. बीड जिल्ह्यातील स्वप्नील काळुंके सह महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे २०-२५ तरुण तर देशातून ...

धनंजय मुंडेंनी मानले राज्य सरकारचे आभार

इमेज
  परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या सुधारित ३०१ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान धनंजय मुंडेंनी मानले राज्य सरकारचे आभार मुंबई (प्रतिनिधी) - परळी वैद्यनाथ येथील पंचम ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या सुधारित ३०१.५४ कोटी रुपयांच्या एकूण ६३ कामांना राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता प्रदान केली असून, याबाबतचा शासन निर्णय नियोजन विभागाने निर्गमित केला आहे.  माजी मंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला असून, सुधारित आराखड्यास नव्याने प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा ताई अजितदादा पवार तसेच मंत्री पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले आहेत. काही दिवसांपूर्वी या ६३ कामांना सुधारित मान्यता देण्याबाबत शिखर समितीने निर्णय घेतला होता. त्यानंतर आता प्रत्यक्षात प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.  प्रत्यक्षात परळी वैद्यनाथ येथे मंदिर व परिसरात या विकास कार्यक्रमात भव्य दर...
इमेज
  राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या शहर उपाध्यक्षपदी बाबा शेख यांची निवड परळी वैजनाथ | प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला गती देत पक्षाने बाबा शेख यांची शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. बीडचे खासदार बजरंग (बप्पा) सोनवणे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष बाबा शिंदे आणि शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. केज येथील पवनसुत निवासस्थानी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात नियुक्तीपत्र देऊन बाबा शेख यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच आगामी पक्षकार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची शहर व तालुक्यात संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांचा विस्तार सुरू असून, नव्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पक्ष अधिक जोमाने जनसंपर्क वाढविणार आहे. नियुक्तीनंतर बाबा शेख यांनी पक्ष नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करत, पक्षाची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि संघटना बळकट करण्...

चला हरित परळी घडवूया......

इमेज
ग्लोबल विकास ट्रस्ट, वृक्ष संवर्धन चळवळ आणि परळी नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम; पथनाट्यातून दिला वृक्षसंगोपनाचा संदेश परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंगोपनाचा प्रभावी संदेश देण्यासाठी परळी शहरात वटपौर्णिमेच्या औचित्यावर विशेष जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल विकासच ट्रस्ट, वृक्षसंवर्धन चळवळ व नगरपालिका प्रशासन आणि यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज, सोमवार २९ जून रोजी शहरातील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय, मिलिंद महाविद्यालय, विद्यार्धिनी विद्यालय व भेल स्कूलमध्ये पथनाट्याला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाट्यातून दिला 'झाडे लावा, झाडे जगवा'चा संदेश वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल या पार्श्वभूमीवर मानवी जीवनात वृक्षांचे काय महत्त्व आहे, हे कलाकारांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मांडले. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज कशी बनली आहे, यावर पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला. पाणीटंचाई, ग्लोबल वॉर्मिंग आणि वृक्षतोडीचे दुष्परिणाम अत्यंत सोप्या आणि अंगाव...
इमेज
आयु. करुणाताई धम्मानंद कांबळे यांना ‘मा. रामचंद्रजी इंगळे सामाजिक सेवा पुरस्कार–२०२६’ प्रदान छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर, परळी येथे दैनिक वृत्तरत्न सम्राट आयोजित भव्य वाचक मेळाव्यात समाजकार्याचा गौरव करणारा विशेष सोहळा उत्साहात पार पडला. आंबेडकरी चळवळीतील तत्त्वनिष्ठ आधारस्तंभ, बीड जिल्हा परिषदेचे अनुसूचित जाती प्रवर्गातील पहिले सदस्य तथा स्मृतिशेष मा. रामचंद्रजी (अप्पा) इंगळे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘मा. रामचंद्रजी इंगळे सामाजिक सेवा पुरस्कार–२०२६’ यंदा भारतीय बौद्ध महासभा, लातूर जिल्हाध्यक्ष तथा किनगावच्या लोकनियुक्त सरपंच आयु. करुणाताई धम्मानंद कांबळे यांना प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप मानाची शाल, पुष्पगुच्छ आणि आकर्षक मानपत्र असे होते. सामाजिक, शैक्षणिक, महिला सक्षमीकरण, बौद्ध धम्मप्रसार आणि आंबेडकरी चळवळीतील त्यांच्या सातत्यपूर्ण व उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. याप्रसंगी स्मृतिशेष मा. रामचंद्रजी इंगळे सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांन...

मोठी बातमी.....मोठी घडामोड

इमेज
स्व.विलास घुले खून प्रकरण: दहाव्या आरोपीला एसआयटीने केली अटक   केज :- प्रतिनिधी... बीड जिल्ह्यातील टाकळी ता. केज येथील स्व. विलास घुले खून प्रकरणात आणखी एका आरोपीला रविवारी लातूर येथून अटक करण्यात आली आहे. आता एकूण दहा आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. स्व. विलास घुले खून प्रकरणी रामेश्वर गायकवाड, बाबासाहेब कदम, मंगेश कदम, संतोष कदम, सूरज उर्फ भैय्यासाहेब कदम, शुभम गायकवाड, नवनाथ कदम, दीपक कदम, अजय कदम या नऊ जणां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणात एसआयटीच्या पथकाने राजकुमार मोरे (रा. सोनीजवळा ता. केज) यास लातूर येथून रविवारी दुपारी अटक केली आहे.  या खून प्रकरणात आता एकूण दहा आरोपींना अटक करण्यात आली असल्याने खळबळ उडाली आहे. टाकळी येथे कँडल मार्च काढला :-  स्व. विलास घुले यांच्या घरापासून रविवारी सायंकाळी ७ वाजता कँडल मार्चला सुरुवात झाली. ज्या ठिकाणी घुले यांची हत्या झाली, या घटनास्थळापर्यंत हा कँडल मार्च काढण्यात आला. कँडल मार्चमध्ये घुले कुटुंब, गावातील महिला व पुरुष हातात पेटत्या मेणबत्त्या घेऊन सहभागी झाले होते.  दोघांच्या पोलीस कोठडीत व...

छत्रपती शिवाजी महाराज चौकात जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी; घोषणांनी परिसर दणाणला

इमेज
परळीत शिवसैनिकांचा जल्लोष; उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जंगी स्वागत! छत्रपती शिवाजी महाराज चौकात जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी; घोषणांनी परिसर दणाणला परळी वैजनाथ | प्रतिनिधी शिवसेनेचे पक्षप्रमुख मा. श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आज धाराशिव येथे आयोजित निष्ठावंत शिवसैनिकांच्या विराट मेळाव्यासाठी जात असताना परळी वैजनाथ येथे शिवसेना परळी शहर व तालुक्याच्या वतीने त्यांचे अभूतपूर्व आणि जंगी स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक भगव्या झेंड्यांनी, ढोल-ताशांच्या गजराने आणि शिवसैनिकांच्या उत्साहाने अक्षरशः दुमदुमून गेला. यावेळी श्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत शिवसेनेचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकात जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली, तर फटाक्यांच्या आतिषबाजीने संपूर्ण परिसर उत्सवमय झाला. शिवसेनाच्या उप नेत्या सुषमा ताई अंधारे तालुकाप्रमुख भोजराज पालीवाल व शहरप्रमुख राजेश विभुते यांनी उद्धव ठाकरे यांना रुद्राक्षाची माळ, भगवी शाल आणि पुष्पगुच्छ अर्पण करून त्यांचे सन्मानपूर्वक स्वागत केले. यावेळी शिवसेना बिड जिला संपर्क प्रमुख परशुराम जाधव शिवसेना बिड जिल्हाप्रमुख र...
इमेज
रामचंद्र इंगळे सामाजिक सेवा पुरस्कार – २०२६’ च्या मानकरी आयु. करुणाताई धम्मानंद कांबळे यांची प्रेरणादायी जीवनगाथा "जीवनाला अर्थ प्राप्त होतो तो पद, प्रतिष्ठा आणि सत्तेमुळे नव्हे; तर समाजासाठी केलेल्या निःस्वार्थ कार्यामुळे!" समाजाच्या इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की त्यांची ओळख केवळ एका पदापुरती मर्यादित राहत नाही. त्यांचे अस्तित्वच एका विचाराचा, एका संघर्षाचा आणि एका परिवर्तनशील प्रवाहाचा अविभाज्य भाग बनून जाते. आपल्या कार्याने, संवेदनशीलतेने, ध्येयनिष्ठेने आणि समाजहिताच्या अखंड बांधिलकीने ज्यांनी जनमानसात आदराचे स्थान निर्माण केले, त्या व्यक्तिमत्त्वाचे नाव म्हणजे आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत आधारस्तंभ, बीड जिल्हा परिषदेचे अनुसूचित प्रवर्गातील सदस्य स्मृतिशेष रामचंद्रजी इंगळे (अप्पा) भारजकर! *आंबेडकरी चळवळीचे तत्त्वनिष्ठ आधारस्तंभ: स्मृतिशेष रामचंद्रजी इंगळे*: बीड जिल्ह्याचे अनुसूचित जाती प्रवर्गातील पहिले माजी जिल्हा परिषद सदस्य, स्मृतिशेष रामचंद्र मरीबा इंगळे यांचे २३ जून २०१८ रोजी झालेले निर्वाण ही आंबेडकरी चळवळीची मोठी हानी होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विच...

मोदीजींचे राष्ट्रहिताचे विचार उर्जा देणारे...

इमेज
ना. पंकजा मुंडेंनी भाजपा कार्यकर्त्यांसमवेत ऐकली पंतप्रधान मोदींची 'मन की बात' मोदीजींचे राष्ट्रहिताचे विचार उर्जा देणारे मुंबई दि. २८ -- राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'मन की बात' कार्यक्रम आज माझगाव येथे भाजपा कार्यकर्त्यां समवेत बसून ऐकला. मोदींजीचे राष्ट्रहिताचे विचार उर्जादायी असतात अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'मन की बात' कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी असतो, पंतप्रधान या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर जनतेशी संवाद साधत असतात. आज मुंबई भाजयुमो आयोजित 'मन की बात - जी नेक्स्ट सोबत' या कार्यक्रमात सहभागी होऊन ना. पंकजाताईंनी नरेंद्रजी मोदी यांचे विचार ऐकले. माझगाव येथील मॅकडोनाल्ड्समध्ये आजच्या तरुण पिढीसोबत राष्ट्रहिताचे हे विचार ऐकणे अतिशय ऊर्जादायी ठरले असल्याचे त्या म्हणाल्या.   ​याप्रसंगी दक्षिण मुंबई  भाजप जिल्हाध्यक्ष शलाका साळवी भाजयुमोचे मुंबई अध्यक्ष दिपक सिंह, महामंत्री नितीन बनकर, आणि आयोजक भाजयुमोचे मुंबई महामंत्री कमलेश ...