इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-परळीत देऊळबंद परिस्थितीत पायरी व कळस दर्शनाने श्रावणी पहिल्या सोमवारी भाविकांची श्रद्धा ओसंडली ! 🕳️ *वैद्यनाथ प्रभुंची पारंपरिक पद्धतीने मनमोहक श्रंगारपुजा(video)

 परळीत देऊळबंद परिस्थिती - पायरी व कळस दर्शनाने श्रावणी पहिल्या सोमवारी भाविकांची श्रद्धा ओसंडली !

🕳️ *वैद्यनाथ प्रभुंची पारंपरिक पद्धतीने मनमोहक श्रंगारपुजा

परळी वैजनाथ, प्रतिनिधी ..

         देऊळबंद परिस्थितीतही पायरी व कळस दर्शनाने परळीत भाविकांची श्रद्धा ओसंडली असल्याचे पहावयास मिळाले.पवित्र श्रावणमास पर्वकाळात दरवर्षी बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ प्रभुंच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते.परंतु कोरोनाविषयक निर्बंधांमुळे गेल्या दोन वर्षांपासून दर्शनबंदी आहे.त्यामुळे भाविक पायरीवरच दर्शन घेत आहेत.आज श्रावणी पहिल्या सोमवारी भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.



                श्रावणमास पर्वकाळात वैद्यनाथ मंदिर परिसर भाविकांच्या उपस्थितीने फुलून जातो. वैद्यनाथ मंदिर,संत जगमित्रनागा मंदिर आदींसह शहरातील मंदिरात दर्शनासाठी परळीत पंचक्रोशीतील हजारो भाविक येतात.पण सध्या या देउळबंद अवस्थेत मंदिरांची दारं बंद असल्याने भाविकांची श्रद्धा पायरीला दर्शन घेऊन वाहिली जात आहे.आज वैद्यनाथ मंदिर परिसरात हे चित्र बघायला मिळाले. या देऊळ बंद ने अनेक समस्या उभ्या केल्या आहेत. देवस्थानावरील अवलंबून असलेली छोटी मोठी व्यवसाय करणारी शेकडो शेकडो लोकांची घरे आता अस्वस्थ आहेत.



                         कोरोनाकाळात बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेले वैद्यनाथ मंदिर बंदच आहे. श्रावण सोमवार निमित्त आज सकाळपासुन परळी शहरातील वैद्यनाथ मंदिर, विठ्ठल मंदीर,संत जगमिञनागा मंदिर, गणेश मंदिरात बाहेरून दर्शन घेतले आहे. प्रभु वैद्यनाथाचा दरवाजा बंद आहे. मंदिर जरी बंद असले तरी भाविकांनी मंदिराच्या पायरीचे व कळसाचे दर्शन घेतले.मंदिर परीसरात सकाळपासुन गर्दी झाल्याचे दिसून आले.  

 🕳️वैद्यनाथ मंदिर येथे श्रंगारपुजा......

                              दरम्यान, वैद्यनाथ मंदिर येथे प्रभु वैद्यनाथाची श्रृंगारपुजा करण्यात आली होती.पारंपारिक पद्धतीने वैद्यनाथाची विशेष पुजा व आरास मांडण्यात आली होती.आकर्षक श्रृंगारपुजा मन मोहित करणारी होती.




टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या