मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

इमेज
द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज  बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे  नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या   धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी),  व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.           स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत...

MB NEWS-वैद्यनाथ साखर कारखान्याचा वजन काटयाची तपासणी

 वैद्यनाथ साखर कारखान्याचा वजन काटा अचूक !!



विशेष भरारी पथकाने केली अचानक पाहणी


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  

राज्याच्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज करीत असलेल्या पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील ऊस वजन काट्याची शासनाच्या वैधमापन खात्याच्या विशेष भरारी पथकाने तपासणी केली असता तपासणीत वैद्यनाथ कारखान्याचा वजन काटा अचूक असल्याचे दिसून आले. वजन काट्यामध्ये कोणतीही तफावत आढळून आली नाही तसा अहवाल वैधमापन खात्याच्या पथकामार्फत देण्यात आला असल्याची माहिती वैद्यनाथचे कार्यकारी संचालक जी. पी. एस. के. दिक्षीतुलू यांनी दिली.

         यंदाचा गळीत हंगाम चालू असून साखर आयुक्त पुणे व जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिलेल्या आदेशानुसार शासनाच्या विशेष भरारी पथकाने मंगळवार दिनांक १९ जानेवारी रोजी कारखान्यास अचानक भेट देवून वजन काट्याची तपासणी केली. सध्या शासनाच्या आदेशानुसार सर्वच कारखान्याची तपासणी केली जात असुन त्याचाच एक भाग म्हणून ही तपासणी करण्यात आली. सदर तपासणीत वैद्यनाथ साखर कारखान्याचे वजन काटे हे अचूक आढळून आले असून तसा अहवाल पथकाने कारखान्यास दिला असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक जी. पी. एस. के. दिक्षीतुलू यांनी दिली आहे. 

      नायब तहसीलदार बाबुराव रुपनर, वैधमापनशास्त्र विभागाचे निरीक्षक पी. बी. मेने, लेखापरिक्षक श्रेणी-1 ए. बी. नागरगोजे, शेतकरी प्रतिनिधी लक्ष्मण भरत सोळुंके, माणिक रेऊ पवार , पोलीस प्रतिनिधी रामचंद्र केकान यांच्या विशेष पथकाने कारखान्यास भेट देऊन कारखान्यातील वजन काट्यांची तपासणी केली. 

          भरारी पथक येण्यापुर्वी शेतक-यांची ऊसाने भरलेली वाहने वजन करून गव्हाणीकडे पाठवण्यात आली होती. त्याचवेळी भरारी पथकाने हीच वाहने परत बोलावून त्या-त्या काट्यावर फेर वजन तपासणी केली असता वजन अचूक आणि तंतोतंत आढळून आले. भरारी पथकाने समाधान व्यक्त करून तसा अहवाल कारखान्यास दिला. इतकेच नव्हे तर ऊस वजनासाठी वापरात असलेले वजन काट्यांची शासनाच्या वैधमापनशास्त्र विभागाकडून पडताळणी व मुद्रांकीत झाले असल्याचे प्रमाणपत्रासह पथकाच्या निदर्शनास आणून दिले. कारखान्याकडे स्वत:ची प्रमाणीत वजने यांची पथकाने बराच वेळ तपासणी केली असता तंतोतंत वजन दर्शविले. या भरारी पथकाने कारखान्याचे ऊस वजन काटे अचूक असल्याची खात्री करून घेतली. काट्यांच्या तपासणी वेळी कारखान्याचे चिफ केमिस्ट रमेश जायभाये, केनयार्ड सुपरवायझर वाल्मीक अघाव, केन अकौंटंट माणिक कराड यांच्यासह ऊस उत्पादक सभासद शेतकरी, तोडणी मजूर, वाहतूक ठेकेदार, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....