इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-समाजातील प्रत्येक नागरिकाला अंधारातून प्रकाशाकडे आणण्यासाठी प्रबोधन अभियान शांती, एकात्मता आणी समाजाच्या प्रगतीसाठी या अभियानातून मोठा बदल होईल- मोहम्मद शफी फारोखी परळी जमात-ए-इस्लामी हिंदचा उपक्रम

 समाजातील प्रत्येक नागरिकाला अंधारातून प्रकाशाकडे आणण्यासाठी प्रबोधन अभियान 



शांती, एकात्मता आणी समाजाच्या प्रगतीसाठी या अभियानातून मोठा बदल होईल- मोहम्मद शफी फारोखी


परळी जमात-ए-इस्लामी हिंदचा उपक्रम 


परळी (प्रतिनिधी): 

समाजाला अज्ञान ,घृणा आणि भौतिकवादाच्या अंधकारातून वाचविणे तसेच शांती, एकात्मता आणि समाजाची प्रगती व्हावी या उद्देशाने जमात-ए- इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे अंधारातून प्रकाशाकडे हे राज्यस्तरीय प्रबोधन अभियान २२ जानेवारीपासून राज्यभर राबविण्यात येणार आहे.


 यानिमित्ताने परळी येथील जिजामाता उद्यान परिसरातील फूड जंक्शन येथे पत्रकार परिषदेत जमात-ए-इस्लामी हिंदचे भारतीय समाज विभागाचे सहाय्यक सचिव मोहम्मद शफी फारूखी यांनी माहीती दिली. 


तसेच या अभियानातून इस्लाम धर्माविषयी सामान्य नागरिकांच्या मनातील गैरसमजुती दूर करण्यात येणार आहे.

कोरोना महामारीने भौतिकवादी लोकांचे डोळे उघडले आहे. या स्थितीमुळे त्यांचे सध्याचे विश्वास आणि कार्यशैली मध्ये बदल होण्याची शक्यता आहे. म्हणून जीवन फक्त संपत्ती गोळा करण्याचे नाव नाही व भौतिक उद्देशांच्या परिपूर्तीचे नाव नाही. शेवटी विवेक आणि करुणेशिवाय कुठलेही सुख नाही.


२२ ते ३१ जानेवारी दरम्यान शहरातील प्रत्येक शासकीय व निमशासकीय कार्यालयाला भेटी देणे, युवा व युवतींना माहीती देणे, वृद्धाश्रम व शहर व तालुक्यातील सर्व जाती धर्माच्या धर्मगुरूंच्या भेटी, सामाजिक व राजकीय व्यक्तीच्या भेटी, शाळा- काॅलेजला भेटी, महिलांना विशेष मार्गदर्शन तसेच पुस्तक प्रदर्शन व डाॅ. ह. भ. प. रफीक पारनेरकर यांचे व्याख्यान होईल. या अभियानातून माणसाला अंधारातून प्रकाशाकडे आणण्याचा प्रयत्न होणार असून शहरातील ५० हजार नागरिकांपर्यंत हा संदेश देण्यात येणार आहे.

यावेळी जमातचे शहराध्यक्ष सय्यद अन्वर, जिल्हाध्यक्ष सय्यद इफ्तेखार यांची उपस्थित होती.

सय्यद जाफर, सय्यद अफान, शेख मुदस्सीर, शेख अहमद यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार सय्यद सबाहत यांनी केले.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या