इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-धनंजय मुंडेंची परळी उपजिल्हा रुग्णालयास नवसंजीवनी...* *मुंडेंच्या प्रयत्नातून अद्ययावत एक्स-रे मशीन दाखल तर ईसीजी मशीन येत्या दोन दिवसात येणार*

 *धनंजय मुंडेंची परळी उपजिल्हा रुग्णालयास नवसंजीवनी...*



*मुंडेंच्या प्रयत्नातून अद्ययावत एक्स-रे मशीन दाखल तर ईसीजी मशीन येत्या दोन दिवसात येणार*


परळी (दि. 20) ---- : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परळीकरांना दिलेला शब्द पाळला असून, परळी उपजिल्हा रुग्णालयात ना. मुंडेंच्या प्रयत्नातून एचडीएफसी बँकेच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या (सीएसआर फंड) माध्यमातून अद्ययावत 100 एमए एक्स-रे मशीन आज (बुधवार) दाखल झाली आहे. तर अद्ययावत ईसीजी मशीन येत्या दोन दिवसात दाखल होणार आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून परळी आणि परिसरातील सामान्य नागरिकांचे विविध तपासण्यांसाठी सुरू असलेले हाल आता थांबणार आहेत.



धनंजय मुंडे यांनी कोव्हिड विषाणू संसर्गाच्या सुरुवातीपासूनच बीड जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थापनास बळकटी देण्यासाठी महत्वपूर्ण पाऊले उचलली आहेत. कोव्हिड अलगिकरण कक्ष, पीपीई किट आदी विविध सामग्री खरेदी, यांसह जिल्हा रुग्णालय व अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात व्हेंटिलेटर्स उपलब्धी, एमआर आय मशीन, कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळा, प्लाझ्मा थेरपी यंत्रणा आदी विविध आरोग्यविषयक बाबी तातडीने उभ्या करून जिल्ह्यातील जनतेला आरोग्य संजीवनी मिळवून देण्यासाठी महत्वपूर्ण पाऊले उचलली आहेत, तसेच कुठेही निधीची कमतरता भासू दिली नाही. 



परळी येथील उपजिल्हा रुग्णालयातील एक्स-रे मशीन गेल्या अनेक दिवसांपासून मृत अवस्थेत होती, तीच परिस्थिती ईसीजी मशीनची देखील होती. सामान्य नागरिकांना अगदी हाताच्या बोटांचा एक्स-रे जरी काढायचा म्हटलं तर खाजगी रुग्णालयात 400 ते 600 रुपये मोजावे लागतात. मात्र आता हा त्रास कायमचा बंद होणार आहे. 


पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून परळी उपजिल्हा रुग्णालयास एचडीएफसी बँकेने त्यांच्याकडील सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर फंड) वापरून एक्स-रे व ईसीजी मशीन उपलब्ध करून दिली आहे. एक्स-रे मशीन आज परळीत दाखल झाली असून, ती येत्या दोन दिवसात कार्यान्वित करण्यात येईल, तर इसीजी मशीन येत्या दोन दिवसात रुग्णालयात दाखल होणार असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनेश कुर्मे यांनी दिली आहे; तसेच या दोनही अद्ययावत उपकरणांसाठी डॉ. कुर्मे व समस्त उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने ना. धनंजय मुंडे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या