इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-परळी मतदारसंघातील पाच ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात* *पंकजाताई मुंडेंनी केले सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन*

 *परळी मतदारसंघातील पाच ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात* 



*पंकजाताई मुंडेंनी केले सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन*


परळी दि. 18 ------ ग्रामपंचायत निवडणूकीच्या आज झालेल्या मतमोजणीनंतर परळी मतदारसंघातील पाच ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या असून सर्व विजयी उमेदवारांचे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी अभिनंदन केले आहे.


   परळी मतदारसंघातील 12 ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडल्या. परळी तालुक्यातील रेवली व वंजारवाडी या दोन ग्रामपंचायती या अगोदरच बिनविरोध भाजपच्या ताब्यात आल्या होत्या. शुक्रवारी उर्वरीत पाच आणि अंबाजोगाई तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले होते. आज झालेल्या मतमोजणीनंतर परळी तालुक्यातील भोपळा आणि मोहा या ग्रामपंचायती भाजपकडे आल्या. मोहा येथे भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गावं पातळीवर आघाडी स्थापन करण्यात आली होती, त्याला मतदारांनी निर्विवाद कौल दिला. परळीतील चार आणि अंबाजोगाई तालुक्यातील दत्तपूर अशा पाच ग्रामपंचायतीवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व स्थापन झाले. आजच्या मतमोजणीनंतर भाजपला रेवली येथील एका व लाडझरी येथील दोन जागांवर विजय मिळाला . या सर्व विजयी उमेदवारांचे पंकजाताई मुंडे यांनी अभिनंदन केले आहे.

 

   विजयी झालेल्या उमेदवारांचे भाजपचे ज्येष्ठ नेते जीवराज ढाकणे, तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, वैद्यनाथ बँकेचे संचालक रमेश कराड, भीमराव मुंडे यांनी यशःश्री निवासस्थानी पुष्पहार घालून अभिनंदन केले

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या