MB NEWS- *नवनवीन व्यवसाय सामाजिक जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावतात-डाॅ.संतोष आर.मुंडे* • *_विजय कुलर कंपनीचा कन्हेरवाडी येथे शानदार शुभारंभ_*•

 *नवनवीन व्यवसाय सामाजिक जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावतात-डाॅ.संतोष आर.मुंडे*



• *_विजय कुलर कंपनीचा कन्हेरवाडी येथे शानदार शुभारंभ_*•


परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

    नवनवीन व्यवसाय सामाजिक जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावतात. आपल्या भागात नविन व्यवसायांची सुरुवात होत असुन विजय कुलर कंपनीच्या माध्यमातून दर्जेदार उत्पादन ग्राहकांना मिळेल असे प्रतिपादन डाॅ.संतोष आर.मुंडे यांनी केले.विजय कुलर कंपनीचा कन्हेरवाडी येथे शानदार शुभारंभ झाला याप्रसंगी ते बोलत होते.

      अंबाजोगाई रोड कन्हेरवाडी येथे काल दि.१७ जानेवारी रोजी विजय कुलर कंपनीचा  शानदार डाॅ.संतोष आर.मुंडे यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.प्रज्ञाताई मुंडे,नागनाथ निवासी विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही.ए.चव्हाण, नागापुरचे उपसरपंच शिवराज मुंडे,वडखेलचे माजी सरपंच चंद्रकांत देवकते, मरळवाडीचे सरपंच राम आंधळे, गोविंद तिडके, शरद कराड, सचिन मुंडे, श्रीराम मुंडे, सुशेण मुंडे, धनाजी कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांचे स्वागत विजय कुलर कंपनीचे संचालक विनोद फड,सतिष नागरगोजे यांनी केले. सुत्रसंचलन संजय फड सर यांनी तर आभार प्रदर्शन आशोक नागरगोजे यांनी केले.कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !