इमेज
  ग्लोबल विकास ट्रस्ट आणि परळी नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम; पथनाट्यातून दिला वृक्षसंगोपनाचा संदेश परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंगोपनाचा प्रभावी संदेश देण्यासाठी परळी शहरात आज एका विशेष जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल विकासच ट्रस्ट, नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक वृक्षसंवर्धन चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज, शुक्रवार २६ जून रोजी शहरातील प्रमुख आणि गजबजलेल्या भागात या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मोंढा मार्केट, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नेहरू चौक तळ परिसराचा समावेश होता. या पथनाट्याला परळीकरांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाट्यातून दिला 'झाडे लावा, झाडे जगवा'चा संदेश वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल या पार्श्वभूमीवर मानवी जीवनात वृक्षांचे काय महत्त्व आहे, हे कलाकारांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मांडले. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज कशी बनली आहे, यावर पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला. पाणीटंचाई, ग्लोबल वॉर्मिंग आण...

MB NEWS-अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला ;ओळख पटविण्याबाबत पोलिसांचे आवाहन

 अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला ;ओळख पटविण्याबाबत पोलिसांचे आवाहन



परळी वैजनाथ, प्रतिनिधी... 

        परळी शहरातील उड्डाण पुलाच्या बाजूला अभय बेकरी जवळ एका 35 वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला असून या मृतदेहाची ओळख पटविण्याबाबत संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

Click &Read:नगराध्यक्ष, सरपंचांची निवड थेट जनतेतून होणार; सरकारचे ९ महत्त्वपूर्ण निर्णय

       याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दिनांक 11 जुलै रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूल परिसरात अभय बेकरी जवळ अंदाजे 35 वर्षिय वयाच्या एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. उंची अंदाजे पाच फूट तीन इंच ,सावळा रंग ,पांढरे केस, चेहऱ्यावर थोडीशी वाढलेली दाढी अशा वर्णनाचा पुरुष मृतदेह आढळून आला आहे. या अनोळखी मयताची ओळख पटविण्यासाठी परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्याची संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या