इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS- *एकनाथ शिंदेंच्या बंडाचा हिशोब येणारा काळ घेईलच-अभयकुमार ठक्कर*

 एकनाथ शिंदेंच्या बंडाचा हिशोब येणारा काळ घेईलच-अभयकुमार ठक्कर




*परळी/प्रतिनिधी*

शिवसेना हा केवळ पक्ष नाही तर मराठी माणसांच्या भल्याचा विचार करणारी संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार राज्यासोबत देशभरात पोहचविण्याचे काम करण्यात आले असून एकनाथ शिंदे यांनी विचाराची आणि पक्ष संघटनेची हत्याच केली आहे. येणारा काळ त्यांना या कृतीचा पश्चाताप करायला भाग पाडेल अशी प्रतिक्रिया शिवसेनेेचे बीड जिल्हा उपप्रमुख अभयकुमार ठक्कर यांनी व्यक्त केली.

निवडणूक आयोगाने शिवसेना नावासोबतच निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवले असून शिवसेनेचा विचार व प्रभाव इतिहास जमा करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत पाडलेल्या फुटीमुळे घडला आहे. ज्या पक्षात आपण लहानाचे मोठे झालो, ज्या पक्षाने आपल्याला पद आणि प्रतिष्ठा दिली त्या पक्षाला मुठमाती देण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केल्याचा आरोप अभयकुमार ठक्कर यांनी केला आहे. वास्तविक पाहता शिवसेना 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करणारी संघटना असून राज्यभरात रक्त वाहिन्यांसारखे शिवसेनेचे जाळे पसरले आहे. तुम्ही मनातून शिवसेनेतून बाहेर पडला असलात तरी लाखो नागरिक आणि शिवसैनिकांच्या मनात अजूनही शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव कायमच राहील असे सांगत तुमच्या कृतीचा हिशोब येणारा काळ करेल तेंव्हा तुम्ही सैरभैर झाला असेल असा टोलाही अभयकुमार ठक्कर यांनी लगावला.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या