इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-भाजप नेते विजय गव्हाणेंचा गुरुवारी होणार राष्ट्रवादीत प्रवेश

style="font-size: x-large;">भाजप नेते अॅड. विजय गव्हाणेंचा गुरुवारी होणार राष्ट्रवादीत प्रवेश

 परभणी,दि.11(प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अ‍ॅड. विजय गव्हाणे हे गुरुवारी (दि.13 जानेवारी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.

      राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे, जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता अ‍ॅड. गव्हाणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात हा पक्ष प्रवेशाचा सोहळा होणार आहे. यावेळी खासदार श्रीमती फौजिया खान, आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे अन्य आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकारी व नेते उपस्थित राहणार आहेत. या पक्ष प्रवेशाच्या सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर अ‍ॅड. गव्हाणे यांनी गेल्या दोन दिवसात ज्येष्ठ नेते पवार, उपमुख्यमंत्री पवार व प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या गाठीभेटी घेतल्या. बैठकांमधून हितगूज केले. ज्येष्ठ नेते पवार यांच्यासह सहकार्‍यांनी केलेल्या आवाहनानंतर अ‍ॅड. गव्हाणे यांनी राष्ट्रवादीत प्रवेशाचा निर्णय घेतला.दरम्यान, ज्येष्ठ नेते कै. गोपीनाथराव मुंडे व ज्येष्ठ नेते कै. प्रमोद महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत गेल्या 20 वर्षांपूर्वी अ‍ॅड. गव्हाणे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!