प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-42 वे मराठवाडा साहित्य संमेलन घनसावंगीत, उद्घाटनाला उद्धव ठाकरे! अशोक चव्हाण-पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर!!

 42 वे मराठवाडा साहित्य संमेलन घनसावंगीत, उद्घाटनाला उद्धव ठाकरे! अशोक चव्हाण-पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर!!



जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे 10 व 11 डिसेंबर रोजी 42 व्या मराठवाडा साहित्य संमेलमनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. तर संमेलनातील एका कार्यक्रमात अशोक चव्हाण आणि पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर असतील. संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी ही माहिती दिली.

जालना येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. घनसावंगीतील संत रामदास महाविद्यालयात 42 वे मराठवाडा साहित्य संमेलन 10 व 11 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक शेषराव मोहिते असणार आहेत.

10 तारखेला सकाळी साडेआठ वाजता ग्रंथ दिंडीला सुरुवात होणार आहे. तर सकाळी साडेदहा उदघाटन सोहळा पार पडणार आहे.

10 आणि 11 डिसेंबर रोजी हे साहित्य संमेलन रंगणार आहे. संमेलनात कथाकथन, परिसंवाद, कविता वाचन, प्रकट मुलाखत आदी कार्यक्रमांची रेलचेल असेल.

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

10 डिसेंबर रोजी मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्धाटन होईल. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती असेल. या कार्यक्रमात, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्यासह माजी खासदार चंद्रकांत खैरे, राजेश टोपे, बबनराव लोणीकर, सतीश चव्हाण आदी उपस्थित असतील.

संमेलनाचं खास आकर्षण

यंदा प्रथमच मराठवाड्यातील राजकीय चित्रः दशा आणि दिशा या विषयावर साहित्य संमेलनात परिसंवाद ठेवण्यात आला आहे. या परिसंवादाच्या व्यासपीठाकडे राजकीय आणि साहित्य वर्तुळाचं लक्ष लागलंय.

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे परिसंवादाच्या अध्यक्षपदी असतील. तर भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यात सहभागी होती.

पंकजा मुंडे यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री राजेश टोपे, बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर आणि माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख या परिसंवादात उपस्थित सहभाग घेतील.

11 डिसेंबर म्हणजेच संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी 2 ते 5 वाजेच्या दरम्यान हा परिसंवाद पार पडेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या