प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-हेळंब ग्रा.पं. बाळासाहेबांची शिवसेनेच्या ताब्यात आणू- विष्णु लांडगे

 हेळंब ग्रा.पं. बाळासाहेबांची शिवसेनेच्या ताब्यात आणू- विष्णु लांडगे 



परळी (प्रतिनिधी)

 परळी तालुक्यातील हेळंब ग्रामपंचायतीची निवडणुक बाळासाहेबांची शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी शिंदे व विधानसभा प्रमुख धनंजय गित्ते यांच्या नेतृत्वाखाली पुर्ण ताकदीने लढणार असुन यासाठी स्वतंत्र पॅनल उभा केला असुन हेळंब ग्रामपंचायत बाळासाहेबांची शिवसेनेच्या ताब्यात आणु असा विश्वास सरपंच पदाचे उमेदवार विष्णु वामन लांडगे यांनी व्यक्त केला. 

 बाळासाहेबांची शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी शिंदे व विधानसभा प्रमुख धनंजय गित्ते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,खा.डॉ.श्रीकांत शिंदे,जिल्हाप्रमुख सचिन मुळुक यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक पातळीवर जिथे शक्य असेल तेथे भाजपाबरोबर युती करुन व जिथे शक्य नसेल तेथे स्थानिक पातळीवर निर्णय घेवुन स्वतंत्र निवडणुक लढवण्याचे जाहिर केल्यानंतर परळी विधानसभा मतदार संघात अनेक गावामध्ये उमेदवार दिले आहेत.हेळंब येथे पॅनलप्रमुख अनंत हरिश्चंद्र आंधळे,राजेभाऊ महारुद्र आंधळे,नाथराव सटवाजी आंधळे व ग्रामस्थांच्या वतिने सदस्य पदासाठी हरिश्चंद्र नारायण आंधळे,उषा विष्णु लांडगे,अर्जुन गौतम आंधळे,चंद्रकला रामराव पाळवदे,कारभारी ज्ञानोबा पाळवदे,ताराचंद नारायण आंधळे यांची उमेदवारी दाखल केलेली असुन आम्ही ही निवडणुक पुर्ण ताकदीने लढणार असल्याचे सरपंच पदाचे उमेदवार विष्णु वामन लांडगे यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या