MB NEWS-पद्मविभूषण खा. शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त परळीत होणार दीपोत्सव

 पद्मविभूषण खा. शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त परळीत होणार दीपोत्सव



शालेय साहित्य, ब्लँकेट वाटपांसह धार्मिकस्थळी प्रार्थना


परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

   राष्ट्रवादी काँग्रेस परळीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्वेसर्वा पद्मविभूषण खा. शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त परळीत  दीपोत्सव साजरा होणार आहे.त्याचबरोबर शालेय साहित्य,ब्लँकेट वाटपांसह धार्मिकस्थळी प्रार्थना आदी कार्यक्रम होणार आहेत. 

     सध्या परळी तालुक्यातील ८० ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरु आहेत. त्यामुळे आचारसंहिता असल्याने शरद पवार यांचा  वाढदिवस साधेपणाने साजरा होणार आहे. यापूर्वी आधार महोत्सव,स्वाभिमान महोत्सव या माध्यमातून  विविध लोकोपयोगी उपक्रम घेतले गेलेले आहेत. परंतु अचारसंहिता लागू असल्याने यावर्षी साधेपणाने वाढदिवस होणार आहे.


        यंदा देशाचे माजी कृषि मंत्री पद्मविभूषण खा. शरदचंद्र पवार यांचा ८२ वा वाढदिवस आहे.या अनुषंगाने प्रभु वैद्यनाथास अभिषेक, उमर शहावली व हैदर शहावली दर्गा येथे चादर अर्पण करणे,शालेय साहित्य वाटप,ब्लँकेट वाटप असे उपक्रम घेण्यात येणार आहेत. वैद्यनाथ मंदिर परिसर येथे सायंकाळी पवार साहेबांच्या आयु अरोग्यकरिता ८२०० दिव्यांनी  दीपोत्सव साजरा होणार असून अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट येथे सायंकाळी अन्नदान यासह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात करण्यात येणार आहे.

      या कार्यक्रमांत  मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस परळीच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार