MB NEWS-*बीड जिल्ह्यातील कलाकारही झळकणार*

  ग्लोबल आडगाव मराठी चित्रपटाची कोलकत्ता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल साठी निवड



बीड जिल्ह्यातील कलाकारही झळकणार

परळी( प्रतिनिधी.)   सुपरस्टार अभिनेते सयाजी शिंदे तसेच ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्यासह 700  कलाकारांचा समावेश असलेला  ग्लोबल आडगाव हा एकमेव मराठी चित्रपट पश्चिम बंगाल सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोलकत्ता आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल साठी निवडण्यात आला असून यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर ग्लोबल आडगाव पोहोचला आहे. या चित्रपटात बीड जिल्ह्यातील कलाकारही  झळकणार आहेत.

     सिल्वर ओक फिल्म अँड इंटरटेनमेंट निर्मित राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त उद्योजक निर्माता मनोज कदम तसेच सहाय्यक निर्माते अमृत मराठे, यांची निर्मिती असलेला तसेच दादासाहेब फाळके पुरस्कार, याबरोबरच अमेरिका फाऊंडेशन सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांचे अनेक पुरस्कार प्राप्त लेखक दिग्दर्शक प्रा. अनिल कुमार साळवे यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेला ग्लोबल आडगाव हा मराठी चित्रपट कोलकत्ता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल साठी निवडण्यात आला आहे.

     ग्लोबल आडगाव या मराठी चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात सुपरस्टार अभिनेते सयाजी शिंदे ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी, अनिल नगरकर, रोनक लांडगे, अशोक कानगुडे, सिद्धी काळे, वैदेही कदम विष्णू भारती, महेंद्र खिल्लारे, आदी मराठी चित्रपटातील दिग्गज कलाकार सहीत सुमारे सातशे कलाकारांचा समावेश असलेला एकमेव मराठी चित्रपट आहे. या चित्रपटात बीड जिल्ह्यातील  प्रा. सिद्धार्थ तायडे यांनी सहाय्यक दिग्दर्शकाची तसेच अभिनयाची चुणूक दाखविली आहे. तसेच महेंद्र खिल्लारे प्रा. ज्ञानेश्वर सोनवणे रानबा गायकवाड. जितेंद्र सिरसाट आदी कलाकारांनी अभिनय केला आहे.

    कोलकत्ता येथे येत्या 20 ते 22 डिसेंबर दरम्यान या चित्रपटाची स्क्रिनिंग होणार आहे. पश्चिम बंगाल सरकारच्या वतीने हा कोलकत्ता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आयोजित करण्यात येतो. यासाठी मराठी चित्रपट सृष्टीतून एकमेव ग्लोबल आडगाव ची निवड झाल्याने चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक प्रा. अनिल कुमार साळवे. निर्माते उद्योजक मनोज कदम सहाय्यक निर्माते अमृत मराठे, सहाय्यक दिग्दर्शक प्रा. सिद्धार्थ तायडे तसेच सर्व कलाकारांचे अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार