प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-पार्वतीबाई रामकिशन आंधळे यांचे वृधापकाळाने निधन

 मरळवाडी चे माजी सरपंच संदिपान आंधळे यांना मातृशोक!



पार्वतीबाई रामकिशन आंधळे यांचे वृधापकाळाने निधन 

परळी दि.९(प्रतिनिधी)मरळवाडी चे माजी सरपंच तथा भाजपाचे नेते संदिपान आंधळे यांच्या मातोश्री सौ.पार्वतीबाई रामकिशन आंधळे यांचे शुक्रवार दि.९ डिसेंबर रोजी पहाटे वृधापकाळाने दु:खद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ६५ वर्षाचे होते. शुक्रवारी सकाळी ९वाजता शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर मरळवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

सौ.पार्वतीबाई रामकिशन आंधळे या अत्यंत धार्मिक वृत्ती च्या आणि मायाळू स्वभावाच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या.परंतु शुक्रवारी दि.९डिसेंबर रोजी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्याच्यां पार्थिवावर मरळवाडी येथे शुक्रवार सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. 

रविवार दि.११डिसेंबर रोजी सकाळी ७वाजता रक्षाविधी. 

दरम्यान मयत पार्वतीबाई रामकिशन आंधळे यांचा रक्षाविधी रविवार दि. ११ डिसेंबर रोजी मरळवाडी येथे सकाळी ७ वाजता होणार आहे. 

सौ.पार्वतीबाई आंधळे यांच्या पश्चात पती रामकिशन आंधळे, मुले  आण्णासाहेब आंधळे,  माजी सरपंच संदिपान आंधळे, बाबासाहेब आंधळे, दोन मुली, सुना, नांतवंडे असा भरगच्च परिवार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या