दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS:बीडजवळ वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; एक गंभीर

 बीडजवळ वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; एक गंभीर

बीड:

शहरालगतच्या तेलगाव नाका ते पांगरबावडी परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील एक व्यक्ती जागीच ठार झाला तर त्या सोबतचा अन्य एकजण गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 च्या सुमारास अपघाताची ही घटना घडली.

राजकुमार अंकुशराव कुटे (43, रा.कुटेवाडी ता.बीड) असे मयताचे नाव आहे तर त्यांच्या सोबतचा सहकारी या अपघातात गंभीर जखमी झाला. परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले.


 पांगरबावडी शिवारात सायंकाळच्या सुमारास भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात कुटे यांनी गंभीर मार लागला. त्यांचा या अपघातात मृत्यू झाला. माहिती मिळाल्यानंतर पेठ बीड पोलीस ठाण्याचे अधिकारी जाधव यांच्यासह पो.नि.नाईक एम.एम.पाटोळे, पोलीस हवालदार सानप यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. अपघात प्रकरणी रात्री उशीरा पेठ बीड ठाण्यात नोंद झाली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....