इमेज
  ग्लोबल विकास ट्रस्ट आणि परळी नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम; पथनाट्यातून दिला वृक्षसंगोपनाचा संदेश परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंगोपनाचा प्रभावी संदेश देण्यासाठी परळी शहरात आज एका विशेष जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल विकासच ट्रस्ट, नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक वृक्षसंवर्धन चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज, शुक्रवार २६ जून रोजी शहरातील प्रमुख आणि गजबजलेल्या भागात या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मोंढा मार्केट, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नेहरू चौक तळ परिसराचा समावेश होता. या पथनाट्याला परळीकरांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाट्यातून दिला 'झाडे लावा, झाडे जगवा'चा संदेश वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल या पार्श्वभूमीवर मानवी जीवनात वृक्षांचे काय महत्त्व आहे, हे कलाकारांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मांडले. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज कशी बनली आहे, यावर पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला. पाणीटंचाई, ग्लोबल वॉर्मिंग आण...

सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

 खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत उद्या परळीत भाजपच्या  विविध आघाड्यांचा मेळावा

सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन


परळी वैजनाथ । दिनांक २४।

मोदी @9 महा जनसंपर्क अभियानांतर्गत उद्या २५ जून रोजी खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या विविध आघाड्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे, या मेळाव्यास सर्वांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.


   पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संपूर्ण देशभर भाजपच्या वतीनं महा जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम राबवले जात आहे, त्याचाच एक भाग म्हणून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत विविध ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत आहेत. उद्या रविवारी २५ तारखेला सकाळी ११ वा. एन एच काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे परळी मतदारसंघातील भाजपच्या विविध आघाडया ज्यात युवा मोर्चा, महिला मोर्चा, दलित, अल्पसंख्याक मोर्चा, दिव्यांग सेल अशा विविध आघाडयांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा एकत्रित मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास खा. डाॅ. प्रितमताई मुंडे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार  आहेत, या मेळाव्यास भाजप तसेच आघाडीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महा जनसंपर्क अभियान समितीने केले आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या