इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS:भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पुस्तकसंच भेट

 भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या  जयंती निमित्त स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ॲलन इंटेलिब्रेन कोर्स  पुस्तकसंच भेट


परळी वैजनाथ, प्रतिनिधी 

           सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहून विविध नाविन्यपूर्ण व अभिनव उपक्रम राबवणाऱ्या स्व. माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त परळी शहरातील उपक्रमशील शाळा म्हणून परिचित असलेल्या संस्कार शाळेला कोटा येथील प्रसिद्ध ॲलन इंटेलिब्रेन इन्स्टिट्यूटच्या पहिली ते सातवीसाठी तयार करण्यात आलेल्या अभिनव कोर्सच्या पुस्तक संचांची भेट देण्यात आली.


Click:*राज्यात खळबळजनक घडामोडी: 'अशक्यही शक्य करतील स्वामी' पंकजा मुंडेंच्या ट्विटची चर्चा*



        भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने संस्कार प्राथमिक विद्यालयास ALLEN च्या "IntelliBrain" या कोर्सचे इयत्ता १ ली ते ७ वी चे पुस्तकसंच भेट देण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले.राजस्थान मधील कोटा शहर "शिक्षा की काशी" म्हणून ओळखले जाते.कोटा शहरातून दरवर्षी हजारो विद्यार्थी NEET आणि JEE परीक्षेत नेत्रदीपक सुयश संपादित करीत असतात.कोटा मधील सुप्रसिध्द ALLEN इन्स्टिट्युटने १ ली ते ८ च्या विद्यार्थ्यांसाठी "IntelliBrain" हा अभिनव कोर्स सुरु केलेला असून या कोर्सचे १ ली ते ७ वी चे पुस्तकसंच विद्यार्थ्यांसाठी फाऊंडेशन साठी उपयोगी ठरतील या उद्देशाने विद्यालयास भेट दिले.पुढील काळात प्रयोगशाळा संच सुध्दा भेट देण्यात येणार असल्याचे बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी सांगितले.

Click:● *खळबळजनक: अतिकचे लावले पोस्टर:शहीदाचा दिला दर्जा;धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न*

Video 




Advertise 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या