इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS;गेल्या अनेक वर्षांपासून पंकजाताईंचे संस्थेवर निर्विवाद वर्चस्व!

जवाहर शिक्षण संस्थेवर पंकजाताई मुंडे यांची बिनविरोध निवड




गेल्या अनेक वर्षांपासून पंकजाताईंचे संस्थेवर निर्विवाद वर्चस्व!


परळी वैजनाथ ।दिनांक १९।

जवाहर शिक्षण संस्थेच्या निवडणूकीत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे. या गटात उमेदवारी अर्ज दाखल केलेले  सदाशिव आप्पा मुंडे यांचे नातेवाईक बालाजी गिते यांनी माघार घेतली आहे.


   लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब व पंकजाताई मुंडे यांचे गेल्या अनेक वर्षांपासून वर्चस्व असलेल्या जवाहर शिक्षण संस्था संचालक मंडळाच्या ३४ जागांसाठी सध्या निवडणूक होत आहे. या निवडणुकीत पंकजाताई मुंडे यांनी हितचिंतक सभासद गटातून उमेदवारी दाखल केली होती. त्यांच्या विरोधात संस्थेचे सदाशिव आप्पा मुंडे यांचे भाचे बालाजी रामचंद्र गिते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बालाजी गिते यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने पंकजाताई मुंडे बिनविरोध विजयी झाल्या आहेत. यापूर्वी आश्रयदाता सभासद गटाची जागा बिनविरोध निवडून आल्याने आता ३२ जागेसाठी निवडणूक होणार आहे. दरम्यान बिनविरोध निवडून आल्याबद्दल पंकजाताई मुंडे यांचे संस्थेच्या संचालक मंडळाने अभिनंदन केले आहे.

••••


Click:● *खळबळजनक: अतिकचे लावले पोस्टर:शहीदाचा दिला दर्जा;धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न*

Video 




Advertise 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट