MB NEWS:परळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी सूर्यभान मुंडे तर उपसभापती पदी सौ. भाग्यश्री संजय जाधव

 परळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी सूर्यभान मुंडे तर उपसभापती पदी सौ. भाग्यश्री संजय जाधव

परळीवैजनाथ, प्रतिनिधी...

      कृषी उत्पन्न बाजार समिती परळी वैजनाथ च्या सभापतीपदी सूर्यभान मुंडे व उपसभापतीपदी सौ. भाग्यश्री संजय जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे.

     परळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, उपसभापती पदाच्या निवडीसाठी आज विशेष सभा पार पडली. या सभेत सर्वानुमते सभापती व उपसभापती पदाची बिनविरोध निवड करण्यात आली. सभापती पदी सूर्यभान मुंडे यांची निवड करण्यात आली तर उपसभापतीपदी सौ.भाग्यश्री संजय जाधव यांची निवड झाली आहे. परळी कृषी उत्पन्न बाजार समितीवर आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनल ची एकहाती सत्ता आहे. आ. धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार या निवडी बिनविरोध झाल्या. या निवडीबद्दल नवनिर्वाचित सभापती, उपसभापती यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. बाजार समितीचे सर्व नवनिर्वाचित संचालक यावेळी उपस्थित होते. निवडीनंतर सभापती व उपसभापती यांचे संचालकांच्या वतीने सत्कार करून स्वागत करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!