इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:परळी येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती शिबीराचे आयोजन

 परळी येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती शिबीराचे आयोजन



बीड (जि.मा.का)

कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आणि नाविण्यता विभाग, महाराष्ट्र  राज्य मुंबई यांच्यामार्फत दि. 24 मे 2023 रोजी सकाळी 9.00 वाजता परळी येथील तिरुपती मंगल कार्यालय, शिवाजी नगर, इटके कॉर्नर, परळी येथे  समूपदेशन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  विद्यार्थ्यासाठी इयत्ता 10 वी 12 वी नंतर काय?  भविष्यात रोजगाराच्या संधी  व्यक्तीमत्व विकास, बायोडाटा तयार करणे, मुलाखतीची तयारी, नवीन तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी इत्यादी विषयी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, प्रोफेसर,टीचर, एन.जी.ओ, यशस्वी उद्योजक मार्गदर्शन व समुदेशन करण्यात येणार असल्याचे परळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस. एस. लोखंडे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

या शिबीराचा सर्व शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्याने लाभ घ्यावा. या शिबीरातुन ग्रामीण व शहरी भागातील इयत्ता 10 व 12 वीच्या विद्यार्थ्याना भविष्यातील करिअर, रोजगाराचे मार्गदर्शनाची संधीचा फायदा मिळेल, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, असेही पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!