युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS:स्तन कर्करोग व थायरॉईड आजारांविषयी मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न

 स्तन कर्करोग व थायरॉईड आजारांविषयी मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न



छत्रपती संभाजीनगर (संजय क्षिरसागर)-कर्करोग व थायरॉईड या आजारांबाबत महिलांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने शहरातील सातवाहन बुद्धविहार, एन १२ सिद्धार्थ नगर, हडको येथे शासकीय कर्करोग रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शनपर व्याख्यान   महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार सर्वसामान्य महिलांमध्ये स्तन कर्करोग व थायरॉईड या आजारांबाबत जनजागृती  निर्माण करण्याच्या उद्देशाने शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, सर्जिकल ऑनकॉलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ. अजय बोराळकर, हेड-नेक ऑनकॉलॉजी विभागाचे सह प्राध्यापक डॉ.वसंत पवार व डॉ.अर्पिता यांनी उपस्थित महिलांना दोन्ही आजारांबाबत माहिती देऊन मार्गदर्शन केले.

                    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालाजी देशमुख, इंदल जाधव, श्रीमती वैशाली भिवसने, प्रवीण गाडे,भन्तेजी रत्नदीप थेरो, राहुल सरोदे, रमेश मगरे,नंदू दाभाडे ,शशिकांत खंडागळे, विजय मगरे, अजय हिवाळे,लखन निकम,सोनू गडवे, संतोष पवार व शेख मुस्तफिक यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या