युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS:बीडमधील महाप्रबोधन यात्रेला मोठा प्रतिसाद

 भाजपचे हिंदुत्व गरिबांची घरे पेटवणारे: सुषमा अंधारे


बीडमधील महाप्रबोधन यात्रेला मोठा प्रतिसाद  

  बीड,  : आम्ही महागाईवर बोलू लागलो की, मोदी हिंदू खतरे मैं है म्हणता. तुमचे हिंदुत्व हिंदुत्व नाही तर गोरगरिबांची घरे पेटवणारे आहे, अशी घणाघाती टिका सुषमा अंधारे यांनी केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या महाप्रबोधन यात्रेच्या समारोप सभेत उपनेत्या सुषमा अंधारे बोलत होत्या.

      पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणल्या, लोकनेते मुंडे राहिले नाहीत, युती राहिली नाही अन् भाजपा सुद्धा पहिल्या सारखा राहिला नाही. भाजपने स्व. विनायकराव मेटे यांचा वापर करून घेतला, जानकर यांचा वापर केला, खोत यांचा वापर करून घेतला. आता सेनेतून फुटून गेलेल्या शिंदे गटाला वापरून घेत आहेत. महप्रबोधान यात्रा कोणावर टीका करण्यासाठी नाही तर जातीयवाद, धर्मांधता पसरवणाऱ्या भाजपच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी आहे. 450 चे गॅस सिलेंडर 1200 रुपयावर गेले. 30 रुपये किलो मिळणारे पाम तेल 175 रूपयांपेक्षा अधिक झाले. आम्ही महागाईवर बोलू लागलो की मोदी हिंदू खतरे मै है, सांगतात. आम्हाला मोफत काही नको, अंदाचा सिधा नको, मोफत बस तिकीट नको. बाराशेचा गॅस 350 रुपयात देणार आहात का? हे सांगा. लोकांचे मूळ प्रश्न बाजूला ठेवून लोकांनी प्रश्न विचारू नये म्हणून भाजप दंगली घडवत आहे. त्रिंबकेश्वर मंदिर असे वाद उकरून काढत आहेत. केंद्रात मोदी फेकत राहतात अन् महाराष्ट्रात फडणवीस खोटे बोलतात, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी भाजपा, मोदी, फडणवीस, एकनाथ शिंदे यांचा चांगलाच समाचार घेतला.

जिल्हाप्रमुख अनिल जगताप म्हणाले, बीड जिल्ह्यात शिवसेनेची मोठी ताकत आहे. यामुळे शिवसेनेची मशाल हाती घेवून बीड जिल्ह्याला शिवसेनेचा बालेकिल्ला बनवणार असल्याचे सांगत मिंदे गटाचे चारपाच चिल्लर लोक चुळबुळ करतात. त्यांची चुळबुळ जास्त काळ टिकणार नाही, असे जगताप म्हणले. तत्पूर्वी प्रस्ताविकात सुनील धांडे म्हणाले, मिंधे सरकारला जाब विचारून धडा शिकवण्यासाठी महप्रबोधन यात्रा काढली आहे. गद्दार बेईमान झाले तरी बीड जिल्हा ठाकरेंच्या पाठीशी खंबीर उभा असल्याचे धांडे म्हणाले. 

    यावेळी संजय राऊत, चंद्रकांत खैरे, संपदा गडकरी, बदामराव पंडित, अनिल जगताप, राजू वैद्य, युधाजित पंडित, विलास महाराज शिंदे, सुदर्शन धांडे, सुनील सुरवसे, बाप्पासाहेब घुगे, गोरख सिंगण, नितीन धांडे, रतन गुजर, हनुमान जगताप, संगीता चव्हाण, निजाम शेख, परमेश्वर सातपुते, विनायक मुळे,यांच्यासह शिवसैनिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

   

लाव रे तो व्हिडिओ म्हणत सूषमा अंधारेनी उडवली मोदींची खिल्ली

    महागाईवर 2014 पूर्वी पंत्रधान मोदी बोलत होते अन् आज काय बोलतात? असे सांगत लावरे तो व्हिडिओ म्हणत, तीन - व्हिडिओ धाखवत अंधारे यांनी पंतप्रधान मोदी यांची चांगलीच खल्ली उडवली.

      

    पन्नास खोके कोणाकडे? 

40- 50 आमदारांना 50- 50 कोटीचा आनंदाचा सीधा अन् लाखो गोरगरीबांना 1 किलो पामतेल, 1 किलो डाळ व साखर. हा अन्याय कशासाठी? दोन हजारांच्या नोटा भाजपातील शेठजी, त्यांचे मंत्री आणि 50 खोक्यावाल्यांकडे आहेत. गुगलवर फेकू शब्द टाका मोदी नाव पुढे येते. कर्नाटकात मोदींचे फोटो लावले, 27 ठिकाणी रोड शो केले. तरी निकाल काय लागला? असा प्रश्न करत बाळासाहेब ठाकरे एक लाख मोदींना भारी होते, असे संजय राऊत म्हणाले. पुढे बोलताना राऊत म्हणले, परळीत वैद्यांनाथा चे दर्शन घेवून आल्यानंतर पत्रकारांनी विचारले, देवाकडे काय मागितले तर यापुढे जेंव्हा दर्शनाला येईल तेंव्हा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना सोबत घेवून येईल. असे सांगत शिवसेना संपवण्याची भाषा कशाला करता तुमचे बाप खाली आले तरी शिवसेना संपणार नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या