श्री सुर्वेश्वर मंदिरात शिव महापुराण कथा आणि पंचकुंडात्मक हरिहर यागाने मंगलमय अधिक मास



शिव महापुराण कथेचे भाविकांना लाभ



परळी वैजनाथ (प्रतिनिधी)...

     बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ येथे अधिक मासानिमित्त सुर्वेश्वर मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या पंचकुंडात्मक हरिहर याग व शिव महापुराण कथा यामुळे मंगलमय धार्मिक पर्वणी सुरू असून या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक सहभागी होत आहेत

       पुरूषोत्तम मास (अधिक मास) पर्वकाळ निमित्ताने येथील श्री सुर्वेश्वर प्रभूंच्या सानिध्यात दिनांक 26 जुलै 2023 ते 1 ऑगस्ट 2023 पर्यंत सकाळी 8 ते 12 या वेळेत पं. विजयजी पाठक यांच्या आचार्यत्वात पंचकुंडात्मक हरिहर याग व दुपारी 2 ते 6 या वेळेत पं. उत्तमजी शास्त्री यांच्या रसाळ वाणीतून शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. अधिकमासाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक पर्वणीला भाविकांची मोठी उपस्थिती लाभत असून महापुराण कथा श्रवणाचा लाभ भाविकांना मिळत आहे त्याबरोबरच हरीहर यागाचा अपुर्व  योगही मिळत आहे.



•••

VIDEO NEWS GALLERY 



















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !