पंकजाताई मुंडे शोकाकुल

 गोरखदादा रसाळ यांना पुत्रशोक:  शेखर रसाळ यांचे अकाली दुःखद निधन ; पंकजाताई मुंडे शोकाकुल 

बीड ।दिनांक २८।

भाजपचे ज्येष्ठ नेते तथा ऊसतोड कामगार संघटनेचे नेते गोरख दादा रसाळ यांच्या तरूण मुलाच्या अकाली दुःखद निधनाबद्दल भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी शोक व्यक्त करत भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.


   गोरख दादा रसाळ यांचे चिरंजीव शेखर यांचं आज अकाली निधन झालं, या बातमीने पंकजाताई मुंडे यांना धक्काच बसला. आपल्या शोकाकुल भावना व्यक्त करताना त्या म्हणाल्या,आमचे ऊसतोड कामगार संघटनेचे नेते गोरख दादा रसाळ यांना अत्यंत दुःखद घटनेला सामोरं जावं लागलं, शत्रुवरही अशी वेळ येऊ नये. त्यांच्या तरूण मुलाचे हृदय विकाराने निधन झाले. प्रचंड धक्कादायक बातमी आहे. कोणत्या शब्दात त्यांचं सांत्वन करावं हा प्रश्न माझ्यासारख्याला पडतोय, शेखरच्या निधनामुळे गोरखदादा यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, त्यांच्या दुःखात मी व माझा परिवार सहभागी आहे,  अशा शब्दांत आपल्या शोकाकुल भावना व्यक्त करून पंकजाताईंनी शेखरला भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. 

••••


•••

VIDEO NEWS GALLERY 













टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार