इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

पंकजाताईंना पुन्हा मोठी जबाबदारी: केंद्रीय स्तरावर फेरनिवड

 भाजपाची राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर; विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया राहटकरांना पुन्हा संधी



नवी दिल्ली – भाजपाने पक्षाच्या बहुप्रतिक्षित संघटनात्मक पुनर्रचनेत, आज राष्ट्रीय कार्यकारिणीच्या नवीन केंद्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली, ज्यात नऊ महिला आणि दोन मुस्लीम नेत्यांचा समावेश आहे. पक्षाचे सरचिटणीस आणि केंद्रीय कार्यालयाचे प्रभारी अरुण सिंह यांनी आज सकाळी ही यादी जाहीर केली ज्यात १३ राष्ट्रीय उपाध्यक्ष, ८ राष्ट्रीय महासचिव, राष्ट्रीय संघटन सरचिटणीस, सह-संघटन महासचिव, १३ राष्ट्रीय सचिव, राष्ट्रीय कोषाध्यक्ष आणि सह- खजिनदार अशी रचना आहे. या पदाधिकाऱ्यांमध्ये ९ महिलांचा समावेश आहे. यावेळी राष्ट्रीय सरचिटणीसांमध्ये एकाही महिलेला स्थान मिळालेले नसून १३ राष्ट्रीय उपाध्यक्षांपैकी पाच आणि १३ राष्ट्रीय सचिवांपैकी चार महिला आहेत.
          भाजपाच्या या राष्ट्रीय कार्यकारणीत महाराष्ट्रातील तिघांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्यात राष्ट्रीय महामंत्री म्हणून विनोद तावडे यांच्यावर जबाबदारी दिली आहे. तर राष्ट्रीय सचिव म्हणून महाराष्ट्रातून विजया रहाटकर, पंकजा मुंडे यांचाही कार्यकारणीत समावेश करण्यात आला आहे.

२ मुस्लीम चेहऱ्यांना राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार रमण सिंह, खासदार सरोज पांडे आणि लता उसेंडी, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार वसुंधरा राजे, झारखंडचे रघुवर दास, मध्य प्रदेशचे सौदान सिंह, उत्तर प्रदेशचे खासदार लक्ष्मीकांत बाजपेयी, खासदार रेखा वर्मा आणि विधान परिषद सदस्य सदस्य तारिक मन्सूर, ओडिशाचे बैजयंत पांडा, तेलंगणाचे डीके अरुणा, नागालँडचे एम चौबा एओ आणि केरळचे अब्दुल्ला कुट्टी, प्रोफेसर तारिक मन्सूर, ज्यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवण्यात आले होते, ते AMU चे कुलगुरू राहिले आहेत. अब्दुला कुट्टी, तारिक मन्सूर हे २ मुस्लीम चेहरे भाजपाने कार्यकारणीत पुढे आणले आहेत.


जे.पी नड्डा यांच्या टीममधून हे चेहरे वगळले

भाजपाच्या या राष्ट्रीय कार्यकारणीतून दोन नेत्यांना राष्ट्रीय सरचिटणीस आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावरून हटवण्यात आले आहे. कर्नाटकातील पराभवामुळे सीटी रवी यांची सरचिटणीस पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्याचबरोबर आसाममधील भाजपा खासदार दिलीप सैकिया यांनाही सरचिटणीस पदावरून दूर केले आहे. यासोबतच हरीश द्विवेदी यांची राष्ट्रीय सचिव पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. उपाध्यक्ष दिलीप घोष आणि भारतीबेन श्याल यांचा नव्या कार्यकारणीत समावेश करण्यात आलेला नाही.



•••

VIDEO NEWS GALLERY 













टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या