– नौशाद उस्मान यांनी लिहिलेला विशेष माहितीपूर्ण लेख.....

इमेज
  काय असतो मुहर्रमचा आशुरा?             – नौशाद उस्मान                सध्या इस्लामी दिनदर्शिकेतील मुहर्रम महिना सुरू आहे. मुहर्रम हा अरबी कॅलेंडरचा पहिला महिना असल्याने इस्लामी नववर्षाची सुरुवात याच महिन्यापासून होते. मात्र पाश्चिमात्य संस्कृतीप्रमाणे नवीन वर्ष साजरे करण्याची परंपरा इस्लाममध्ये नाही.        मुहर्रमपासून हिजरी सन १४४८ ची सुरुवात झाली आहे.               मुहर्रम महिन्याच्या दहाव्या दिवशी "आशुरा" असतो. कॅलेंडरमध्ये "आशुरा" असे लिहिलेले पाहून अनेक मुस्लिमेतर बांधवांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, हा दिवस नेमका कोणता आहे? भारतीय उपखंडात मुहर्रमच्या निमित्ताने काही रूढी, परंपरा आणि प्रथा पाळल्या जात असल्याने अनेकांना हाच संपूर्ण प्रकार म्हणजे आशुरा असावा असे वाटते. परंतु वास्तवात आशुरा हा एक ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेला दिवस आहे. इस्लाममध्ये केवळ दोन सण साजरे करण्याचा आदेश आहे—ईद-उल-फित्र (रमजान ईद) आणि ईद-उल-अजहा (बकरी ईद). या दोन सणांव्यत...

एस.एफ.आय वर्धापन दिन व सावित्रीबाई फुले जयंती साजरी

 एस.एफ.आय वर्धापन दिन व सावित्रीबाई फुले जयंती साजरी

परळी / प्रतिनिधी


महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा च्या महाराष्ट्र विद्यालय संकुलात एस.एफ.आय या विद्यार्थी संघटनेचा वर्धापन दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली या निमित्त शालेय विद्यार्थ्यांचे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

     

महाराष्ट्र प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोहा या ठिकाणी देशातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना असलेल्या स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (एस.एफ.आय) या संघटनेचा वर्धापन दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास संस्थेचे जेष्ठ संचालक सुदामदादा देशमुख,सुदाम शिंदे यांच्यासह एस.एफ.आय संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सत्यजित मस्के,जिल्हाध्यक्ष लहू खारगे तर अध्यक्ष म्हणून शाळेचे उपमुख्याध्यापक मुरलीधर बोराडे आदी उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम एस.एफ.आय संघटनेच्या ध्वजवंदन करून सावित्रीबाई फुले व शहिद भगतसिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  

          यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सत्यजित मस्के यांनी सांगितले की,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले,सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर एस.एफ.आय विद्यार्थी संघटना काम करत असून सर्वाना मोफत शिक्षण मिळावे यासाठी आज ही संघटना प्रयत्नशील असल्याचे म्हटले.यावेळी अनेक शालेय विद्यार्थ्यानी वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रम प्रसंगी शाळेतील जेष्ठ शिक्षक मुकुंद चौधरी व विशाल देशमुख यांनी आपले विचार व्यक्त केले.यावेळी विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या