परळीत दैनिक न्याय टाइम्सचा वर्धापन दिन उत्साहात

इमेज
शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रसारमाध्यमांनी करावे – दीपाताई मुधोळ-मुंडे शासन, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून प्रसारमाध्यमे कार्य करतात – पद्मश्रीताई धर्माधिकारी परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी वैजनाथ येथे दैनिक न्याय टाइम्सच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास सामाजिक न्याय विभागाच्या पुणे समाजकल्याण आयुक्त सौ. दीपाताई मुधोळ-मुंडे (IAS) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच परळीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, ज्येष्ठ नेते भास्कर चाटे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर, काँग्रेस नेते वसंत मुंडे, तसेच दैनिक न्याय टाइम्सचे संपादक बालकिशन सोनी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी संपादक बालकिशन सोनी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव ...

लोक विकास महाआघाडीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांकडून ना.पाटील यांचा ह्रद्य सत्कार

सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यांची राजकिशोर मोदी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट



लोक विकास महा आघाडीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांकडून ना.पाटील यांचा ह्रद्य सत्कार

अंबाजोगाई (प्रतिनिधी):- अंबाजोगाई शहरात बुधवारी एका विवाह सोहळ्यासाठी आलेल्या महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे नेते व माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी मोदींसह, मान्यवर व लोक विकास महाआघाडीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांकडून ना.पाटील यांचा ह्रद्य सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील हे अंबाजोगाई शहरात बुधवार, दिनांक २५ डिसेंबर रोजी एका विवाह सोहळ्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी मोदी परिवार आणि लोक विकास महाआघाडीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांकडून ना.बाबासाहेब पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन ह्रद्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार संजयभाऊ दौंड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे  बीड जिल्हाध्यक्ष ऍड.राजेश्वर चव्हाण, माजी नगराध्यक्ष तथा अंबाजोगाई पिपल्स बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे नेते राजेसाहेब देशमुख, अंबाजोगाई पिपल्स बँकेचे व्हाईस चेअरमन प्रकाश सोळंकी, संचालक ऍड.विष्णुपंत सोळंके, माजी उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे, माजी उपनगराध्यक्ष मनोज लखेरा, डॉ.जाधव, माजी शिक्षण सभापती डॉ.राजेश इंगोले, नवनिर्वाचित नगरसेवक हाजी इस्माईल गवळी, महेश लोमटे, दिनेश भराडिया, अमोल लोमटे, सय्यद ताहेरभाई, आकाश कराड, नजीर (मुन्ना) पठाण, ऍड.विकास काकडे, अकबरखाँ पठाण, मोईनभाई शेख, रौफभाई बिल्डर, भिमसेन लोमटे यांच्यासह  खालेद चाऊस, गफारभाई खान, पंडितराव हुलगुंडे, अश्विन सावंत, दौलत मीरखाँ, प्रविण देशमुख आदींसह अनेकांची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या