इमेज
  दारुने केला घात,साठेनगर मधील एका युवकाचा मृत्यू: नागरीक संतप्त; दारूबंदीसाठी पोलीस ठाण्यात ठिय्या परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       शहरातील साठेनगर भागात आज एका युवकाचा मृत्यू झाला असून दारूच्या व्यसनातूनच हा मृत्यू झाला असल्याचे त्याचे कुटुंबीय व साठेनगर मधील नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या अनेक वर्षापासून साठे नगर मधील दारूचे गुत्ते बंद करा अशी सातत्याने मागणी करण्यात येते. मात्र काही दिवस कारवाई होते. त्यानंतर पुन्हा जशास तसे दारूचे गुत्ते अखंडित सुरू असतात असा आरोप करण्यात आला आहे.      आमच्या साठेनगर मधील युवक व्यसनाधीन झाले असून दारूमुळे अनेक कुटुंबे उध्वस्त होत आहेत. त्यामुळे साठेनगर मध्ये दारूबंदी करा अशा प्रकारची मागणी आज साठेनगर मधील शेकडो नागरिकांनी संभाजीनगर पोलीस ठाण्यात केली. सुरेश मस्के या नावाच्या युवकाचा सकाळी मृत्यू झाला. दारूच्या नशेत  या युवकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. यापूर्वीही याच भागातील तीन युवकांचा दारूच्या नशेतूनच मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. साठेनगर भागात बिनदिक्कतपणे अवैध दारू विक्री होते. हातभट्टी द...

दुःखद वार्ता : भावपूर्ण श्रद्धांजली.....!!!

 प्रवीण रेवलकर यांना पितृशोक




परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

     जि प प्रा शा टोकवाडी शाळेचे शिक्षक श्री प्रवीण रेवलकर यांचे वडील काशिनाथराव गोपाळराव रेवलकर यांचे दि.26 शुक्रवारी सायंकाळी प्रदिर्घ आजाराने वयाच्या 92 वर्षी अंबाजोगाई येथे निधन झाले.ते धार्मिक प्रवृत्तीचे होते.

त्यांच्या पश्चात 2 मुले एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. ते मुळ सिरसाळा येथील रहिवासी होते.त्यांच्यावर दि 27 रोजी बोरूळ तलाव स्मशानभूमी रविवारपेठ अंबाजोगाई येथे अंतिमसंस्कार करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या