शासनाच्या शिक्षक कर्मचारी काव्यवाचन स्पर्धेत परळीचा डंका



कवी दिवाकर जोशी यांची कविता राज्यातून द्वितीय

परळी: महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत शिक्षक कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी राज्यस्तरीय स्वरचित काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन शनीवारी संगमनेर जि.अहिल्यानगर येथे करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्रातील आठ विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चाळीस दर्जेदार कवींच्या स्वरचीत कवितांच्या सादरीकरणातून द्वितीय क्रमांकाने कासारवाडी ति.परळीचे शिक्षक आणि सुप्रसिद्ध गझलकार दिवाकर जोशी यांच्या गझलेची राज्यातील सर्वोत्कृष्ट कवितांमध्ये निवड करण्यात आली.

केंद्र स्तर, तालुकास्तर. विभाग स्तर आणि राज्यस्तर असे टप्पे यशस्वीरित्या पार करत दिवाकर जोशी यांची  'विठ्ठल मला निरंतर विद्यालयात दिसतो' ही गझल महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट ठरली आहे

त्यांच्या या यशाबद्दल परळीचे गटशिक्षणाधिकारी श्री गणेश गिरी, शिक्षण विस्तार अधिकारी श्री दत्तात्रय कोकणे, केंद्रप्रमुख श्री श्याम सातपुते, कासारवाडी चे मुख्याध्यापक श्री आत्माराम आघाव, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्री विजयजी वाकेकर, प्रा. राजकुमार यल्लावाड, प्रा. अरुण पवार,शाहीर अनंत मुंडे, प्रा. संजय आघाव, प्रा. सिद्धार्थ तायडे, पत्रकार रानबाजी गायकवाड, कवी बालाजी कांबळे, कवी सिद्धेश्वर इंगोले, श्री सुनील फुलारी, श्री बंडू आघाव, श्री किरण आटोळकर आणि तालुक्यातील सर्व शिक्षक, साहित्यिक मंडळींनी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!