परळीत दैनिक न्याय टाइम्सचा वर्धापन दिन उत्साहात

इमेज
शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रसारमाध्यमांनी करावे – दीपाताई मुधोळ-मुंडे शासन, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून प्रसारमाध्यमे कार्य करतात – पद्मश्रीताई धर्माधिकारी परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी वैजनाथ येथे दैनिक न्याय टाइम्सच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास सामाजिक न्याय विभागाच्या पुणे समाजकल्याण आयुक्त सौ. दीपाताई मुधोळ-मुंडे (IAS) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच परळीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, ज्येष्ठ नेते भास्कर चाटे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर, काँग्रेस नेते वसंत मुंडे, तसेच दैनिक न्याय टाइम्सचे संपादक बालकिशन सोनी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी संपादक बालकिशन सोनी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव ...

 महेश नवमी निमित्त आयोजित आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

६१ जणांची आरोग्य तपासणी; ८० रक्तदात्यांनी केले रक्तदान
परळी वैजनाथ | प्रतिनिधी
      महेश नवमी २०२६ निमित्त स्व. कौसल्याबाई गोविंदलालजी नावंदर यांच्या स्मरणार्थ परळी माहेश्वरी महिला संघटना आणि परळी तालुका माहेश्वरी युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या समाजोपयोगी उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमात ६१ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली तर ८० रक्तदात्यांनी  रक्तदान केले.
     या शिबिरामध्ये नागरिकांसाठी सीबीसी, एचबीए1, आणि लिक्विड प्रोफाईल यांसारख्या महत्त्वाच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. एकूण ६१ नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला, तर ८० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. यावेळी उपस्थित वैद्यकीय तज्ज्ञांनी नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करत नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व पटवून दिले. तसेच निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून त्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात, याबाबतही जनजागृती करण्यात आली.

        कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, समाजबांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी महिला संघटना, युवा संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
समाजहिताच्या अशा उपक्रमांमुळे सामाजिक ऐक्य आणि सेवाभाव अधिक दृढ होत असून, परळी तालुक्यात या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या