मुख्याधिकारी यांना लिहिले सविस्तर उत्तर......

इमेज
  सरस्वती नदी वाचवा; काँक्रीटीकरण नव्हे तर पुनर्जीवन करा — अश्विन मोगरकर यांचे परळी नगरपरिषदेला निवेदन परळी वैजनाथ : प्रतिनिधी  धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्व असलेल्या सरस्वती नदीच्या काँक्रीटीकरण प्रकल्पाविरोधात सामाजिक कार्यकर्ते अश्विन मोगरकर यांनी परळी वैजनाथ नगरपरिषदेला सविस्तर निवेदन देत हा प्रकल्प तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. नगरपरिषदेकडून दि. 30 एप्रिल 2026 रोजी देण्यात आलेल्या पत्राला उत्तर देताना मोगरकर यांनी म्हटले आहे की, सरस्वती नदी ही नैसर्गिक नदी असल्याचे तसेच ती पूर्वी बाराही महिने वाहत असल्याचे नगरपरिषदेकडून प्रथमच अधिकृतरीत्या मान्य करण्यात आले आहे. भूमी अभिलेख कार्यालयाकडे नदीची नैसर्गिक हद्द कायम करण्यासाठी मोजणीची मागणीही करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. निवेदनात नगरपरिषदेवर गंभीर आरोप करण्यात आले असून, नदीत थेट सांडपाणी व गटाराचे पाणी सोडले जात असल्यामुळे जलप्रदूषण प्रतिबंधक कायद्यांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच नदीपात्रातील अतिक्रमण रोखण्यात नगरपरिषद अपयशी ठरल्याचे सांगत, सरस्वती नदीपात्रात उभारण्यात आल...

"वैद्यनाथ"च्या राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे सांघिक पारितोषिक संभाजीनगरच्या पहाडे विधी महाविद्यालयाकडे




संभाजीनगरचा आदित्य दराडे प्रथम, परळीची कु. लक्ष्मी जुनाळ द्वितीय, धर्मापुरीची कु.अक्षता दहिफळे तृतीय

परळी वैजनाथ (दि.२४)-दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या ७६ व्या जयंतीवर्षाचे औचित्य साधून  जवाहर शिक्षण संस्थेच्या येथील वैद्यनाथ महाविद्यालयात  काल (दि.२३ जाने.) राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा  उत्साहात संपन्न झाली.यात सांघिक पारितोषिक छत्रपती संभाजीनगरच्या माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाच्या  संघाने जिंकले .तर स्पर्धेचे वैयक्तिक प्रथम पारितोषिक (₹ ७०००/-व स्मृतिचिन्ह) याच महाविद्यालयाच्या आदित्य ज्ञानेश्वर दराडे याने पटकावले. द्वितीय पारितोषिक (₹ ५०००/- व स्मृतिचिन्ह) परळी येथील यजमान वैद्यनाथ महाविद्यालयाच्या कु. लक्ष्मी महेश जुनाळ याने मिळवले, तर तृतीय पारितोषिक (₹३००० व स्मृतिचिन्ह) धर्मापुरी येथील कै. शंकरराव गुट्टे महाविद्यालयाच्या कु. अक्षता संतोष दहिफळे हिने जिंकले.  तर उत्तेजनार्थ (₹१०००/-)  ठेवण्यात आलेली तीन पारितोषिके क्रमशः महेश बळीराम गिरी (माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय, संभाजीनगर) ,सूरज श्रीपती सोमवंशी (दयानंद विधी महाविद्यालय, लातूर) आणि कु. विद्या व्यंकट सूर्यवंशी (दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर)कॉलेज यांनी  प्राप्त केले. या स्पर्धेत राज्यातील विविध ठिकाणाहून स्पर्धक मोठ्या प्रमाणात आले होते.

       या राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे उद्घाटन सकाळी प्राचार्य डॉ .जे. व्ही. जगतकर यांच्या शुभहस्ते व विद्यापीठ अधिसभेचे सदस्य डॉ. पी. एल. कराड, प्रा. डॉ. माधव रोडे, उपप्राचार्य प्रा. डी. के. आंधळे, डॉ. व्ही.बी. गायकवाड, प्रा. हरीश मुंडे आदींच्या उपस्थिती संपन्न झाले. पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून जवाहर शिक्षण संस्थेचे सचिव श्री दत्ताप्पा इटके  हे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ .जे.व्ही. जगतकर हे होते.या सर्वांच्या शुभहस्ते  विजेत्यांना पुरस्कारांचे व पारितोषिकांचे प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी श्री इटके यांनी वक्तृत्व कला ही परिश्रमसाध्य असून वक्त्याच्या प्रभावी भाषणामुळे माणसाला जग जिंकता येते. या कौशल्यामुळे नेतृत्वगुण देखील संपादित करता येतात,असे सांगून त्यांनी दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रभावशाली वक्तृत्व शैलीची आठवण करून दिली. तर प्राचार्य डॉ. जगतकर यांनी जीवनात भाषणाच्या माध्यमाने व्यक्तिमत्त्वाची उंची वाढते. यासाठी विद्यार्थीदशेपासूनच हे कौशल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केले. 

      या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. डॉ. टी. बी. पुरी , बी.आर.मसने (अंबाजोगाई), प्रा.एम.एल.देशमुख  व प्रा.डा. टी.ए. गित्ते यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक प्रा. डॉ.नयनकुमार आचार्य यांनी केले, तर कार्यक्रमाची भूमिका प्रा.डा. एम.जी. लांडगे यांनी विशद केली.  पाहुण्यांचा परिचय  प्रा. डॉ. बी.पी. गजभारे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. दिलीप गायकवाड व प्रा. डॉ.एस.पी.गुट्ठे यांनी केले, तर आभार प्रा. संजय रणखांबे यांनी मानले. कार्यक्रमास प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....