परळीत दैनिक न्याय टाइम्सचा वर्धापन दिन उत्साहात

इमेज
शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रसारमाध्यमांनी करावे – दीपाताई मुधोळ-मुंडे शासन, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून प्रसारमाध्यमे कार्य करतात – पद्मश्रीताई धर्माधिकारी परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी वैजनाथ येथे दैनिक न्याय टाइम्सच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास सामाजिक न्याय विभागाच्या पुणे समाजकल्याण आयुक्त सौ. दीपाताई मुधोळ-मुंडे (IAS) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच परळीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, ज्येष्ठ नेते भास्कर चाटे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर, काँग्रेस नेते वसंत मुंडे, तसेच दैनिक न्याय टाइम्सचे संपादक बालकिशन सोनी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी संपादक बालकिशन सोनी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव ...

शाही सोहळ्याची जोरदार तयारी

 जे. के. कन्स्ट्रक्शनचा मुस्लिम धर्मीय सामूहिक विवाह सोहळा उद्या




अनेक मान्यवरांची राहणार उपस्थितीत, सोहळ्याची जय्यत तयारी


नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - जाफर खान, हाजी राजा खान

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) बांधकाम क्षेत्रात संपूर्ण मराठवाड्यात नामवंत म्हणून ओळख असलेल्या जे. के. कन्स्ट्रक्शनने समाजहिताचा उपक्रम हाती घेतला आहे. राजकारण, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या खान बंधूंनी मुस्लिम धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. उद्या गुरुवार दि. 7 मे रोजी हा शाही विवाह सोहळा संपन्न होत असुन त्याची जय्यत तयारी सुरू आहे. या सोहळ्याला नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जे. के. कन्स्ट्रक्शनचे संचालक जाफर खान, उपनगराध्यक्ष हाजी राजा खान यांनी केले आहे. 

       सामाजिक भान ठेवून, समाजाचे देणे लागतो या भावनेतून जे. के. कंट्रक्शन यांच्या वतीने गुरुवार दि. 7 मे रोजी मुस्लिम धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मलकापूर रोडवरील जे. के. फंक्शन हॉल येथे सकाळी 11 वाजता हा सामूहिक विवाह सोहळा थाटात आणि उत्साहात संपन्न होणार आहे. अनेक गरीब कुटुंब कर्ज काढून लग्न करतात. अनावश्यक खर्च केला जातो. हा अनावश्यक खर्च टाळून गरीब कुटुंब स्वाभिमानाने जगावे यासाठीच या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे जे. के. कन्स्ट्रक्शनचे संचालक जाफर खान, उपनगराध्यक्ष हाजी राजा खान यांनी सांगितले.

शाही सोहळ्याची जोरदार तयारी

   जे. के. कंट्रक्शनच्या वतीने समाजातील होतकरू कुटुंबांसाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या शाही थाटात संपन्न होणाऱ्या सामूहिक विवाह सोहोळ्याची जोरदार तयारी सुरू असून ती अंतिम टप्प्यात आली आहे. या सोहोळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. सहभागी जोडप्यांना संसारोपयोगी साहित्यही दिले जाते. त्याचीही तयारी पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. 

या विवाह सोहळ्याला नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जाफर खान उस्मान खान, परळीचे उपनगराध्यक्ष हाजी राजा खान उस्मान खान, उमर खान उस्मान खान, एजाज खान उस्मान खान, वाहेद खान जाफर खान, शाहेद खान राजा खान, शेख मझहरूद्दिन अलीमोदिन, जफर खान जाफर खान, नदीम खान जाफर खान, मुफ्ती तारेक खान एजाज खान, फेरोज खान उमर खान, फाजेब खान उमर खान, तौफिक खान एजाज खान यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या