परळीत दैनिक न्याय टाइम्सचा वर्धापन दिन उत्साहात

इमेज
शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रसारमाध्यमांनी करावे – दीपाताई मुधोळ-मुंडे शासन, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून प्रसारमाध्यमे कार्य करतात – पद्मश्रीताई धर्माधिकारी परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी वैजनाथ येथे दैनिक न्याय टाइम्सच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास सामाजिक न्याय विभागाच्या पुणे समाजकल्याण आयुक्त सौ. दीपाताई मुधोळ-मुंडे (IAS) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच परळीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, ज्येष्ठ नेते भास्कर चाटे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर, काँग्रेस नेते वसंत मुंडे, तसेच दैनिक न्याय टाइम्सचे संपादक बालकिशन सोनी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी संपादक बालकिशन सोनी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव ...

पवित्र वैद्यकीय क्षेत्राला डाग लावणारा गंभीर प्रकार.....!!!

 परळीत धक्कादायक घटना: उपचारात अक्षम्य हलगर्जीपणा !

 गर्भातील बाळाचा मृत्यू, तब्बल २२तास मृत भ्रुण ठेवले पोटात; मातेच्या जीवावर बेतले; डॉक्टरांविरोधात तक्रार

परळी वैजनाथ (प्रतिनिधी):

       शहरातील एका खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांच्या उपचारातील  हलगर्जीपणामुळे गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. त्याचबरोबर या ह्रदयद्रावक घटनेनंतरही गांभीर्य न घेता केवळ अर्थिक लाभ उठविण्याच्या उद्देशाने या गरोदर मातेच्या पोटात तब्बल २२तास मृत भ्रुण ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या डाॅक्टरच्या हलगर्जीने बाळ तर दगावलेच पण त्यानंतर या बाळाच्या मातेची प्रचंड हेळसांड  करुन तिच्याही जीवाशी खेळ केल्याचा अमानवी व वैद्यकीय क्षेत्राला डाग लावणारा गंभीर लज्जास्पद प्रकार  या डाॅक्टरांनी केला आहे. याप्रकरणी संबंधित डॉक्टरां विरोधात शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून कर्तव्यात कसूर, बाळाच्या मरणास कारणीभूत व मातेच्या जीवाशी खेळण्याच्या अघोरी प्रकाराची सखोल चौकशी करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी मागणी करण्यात आली आहे.

     या ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या व धक्कादायक  प्रकारानंतर वैजनाथ संभाजी मुंडे यांनी पोलीसांत धाव घेऊन गित्ते हाॅस्पीटलच्या डाॅ. कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार दाखल केली आहे.तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या पत्नीवर गेल्या काही महिन्यांपासून संबंधित डॉक्टरांकडे उपचार सुरू होते. २३ एप्रिल रोजी अचानक पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यानंतर त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधला. डॉक्टरांनी तातडीने दवाखान्यात येण्यास सांगितले. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतरही योग्य वेळी तपासणी व उपचार करण्यात आले नाहीत. तसेच, सोनोग्राफीसाठी बाहेरील केंद्रावर पाठविण्यात आले. तेथे झालेल्या तपासणीनंतर गर्भातील बाळाची स्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. तरीही रुग्णालयात वेळेत आवश्यक वैद्यकीय निर्णय न घेता विलंब करण्यात आला. दरम्यान, उपचाराच्या नावाखाली वारंवार पैसे मागण्यात आले.प्रचंड अर्थिक शोषण करण्यात आले.

    डाॅक्टरांच्या अक्षम्य दुर्लक्ष व हलगर्जीमुळे गर्भातील बाळाचा मृत्यू  तर झालाच परंतु  गरोदर मातेच्या जीवाशीही खेळण्याचा प्रकार या डाॅक्टरांनी केला. मृत बाळ पोटात असतांना ते काढण्यासाठीची प्रसुती प्रक्रिया करण्यासाठी तब्बल २२ तास लावले ही अतिशय गंभीर बाब असुन या मातेच्या जीवाशीच खेळण्याचा प्रकार केवळ अर्थिक फायदा उचलण्यासाठी करण्यात आलेला आहे. या घटनेमुळे तक्रारदार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या संपूर्ण प्रकरणात संबंधित डॉक्टरांनी निष्काळजीपणा करून रुग्णाच्या जीवाशी खेळ केल्याचा आरोप करत, दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. तसेच, या प्रकरणाची वैद्यकीय व कायदेशीर चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणीही करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाने तक्रार प्राप्त झाल्याची पुष्टी केली असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.

जिल्हा शल्यचिकित्सकांकडेही न्यायाची मागणी

-------------------- 

    दरम्यान,  या धक्कादायक व अमानवी कृत्याची चौकशी करावी व वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली आर्थिक शोषण, मानसिक त्रास आणि नागरिकांच्या जीवाशी होणारा खेळ थांबवावा अशी मागणी करण्यात आली आहे. अतिशय गंभीर असा हा प्रकार पवित्र समजल्या जाणाऱ्या वैद्यकीय क्षेत्राला डाग लावणारा आहे.यापुर्वीही सोनपेठ तालुक्यातील एका महिलेच्या बाबतीतही याच डाॅक्टरांनी असाच प्रकार केल्याचे समोर आले आहे.केवळ अर्थिक लाभ उठविण्यासाठी नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार वारंवार घडत असुन याबाबत वैजनाथ संभाजी मुंडे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांची भेट घेऊन तक्रार दाखल केली आहे.या प्रकरणी आता सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या