परळीत दैनिक न्याय टाइम्सचा वर्धापन दिन उत्साहात

इमेज
शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रसारमाध्यमांनी करावे – दीपाताई मुधोळ-मुंडे शासन, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून प्रसारमाध्यमे कार्य करतात – पद्मश्रीताई धर्माधिकारी परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी वैजनाथ येथे दैनिक न्याय टाइम्सच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास सामाजिक न्याय विभागाच्या पुणे समाजकल्याण आयुक्त सौ. दीपाताई मुधोळ-मुंडे (IAS) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच परळीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, ज्येष्ठ नेते भास्कर चाटे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर, काँग्रेस नेते वसंत मुंडे, तसेच दैनिक न्याय टाइम्सचे संपादक बालकिशन सोनी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी संपादक बालकिशन सोनी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव ...

 बीड येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात ॲड. वैजनाथ दिपकराव वांजरखेडे यांना 'किसान कृषीरत्न पुरस्कार' प्रदान




बीड : ( प्रतिनिधी ) 

येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर सोमवार, ४ मे २०२६ रोजी सायंकाळी ५:४५ वाजता हा दिमाखदार सोहळा पार पडला महाराष्ट्र शासन कृषी विभाग व किसान कृषी विकास प्रतिष्ठान, गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य 'राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन २०२६' मध्ये कायदेशीर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अंबाजोगाईचे सुप्रसिद्ध विधीज्ञ ॲड. वैजनाथ दिपकराव वांजरखेडे यांना 'किसान कृषीरत्न पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले.श्रीमती ज्योतीताई मेटे (अध्यक्षा, शिवसंग्राम) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.ॲड वांजरखेडे यांनी सर्वसामान्यांमध्ये कायदेशीर जागृती निर्माण व्हावी म्हणून  शेती असोत किंवा कौटुंबिक कायदे किंवा चेक बाऊन्स अश्या विविध कायद्यातील क्लिष्टता सोप्या भाषेत मांडून त्यांचे या विषयावरील लेख विविध वृत्तपत्रे, मासिके तसेच डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुद्धा प्रकाशित झाले आहे तसेच कृषी विभागाच्या शेतकरी मासिकात सुद्धा त्यांचे लेख प्रकाशित होत असतात तसेच मोडी लिपी लिप्यंतरकार महाराष्ट्र शासन प्रमाणित असल्याने जुन्या मोडी लिपीतील कागदपत्रांचे लिप्यंतर करून अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची जमीन मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच डिजिटल प्लॅटफॉर्म द्वारे सुद्धा ते शेती कायदे असोत किंवा अन्य कायदेशीर जागृतीबाबत काम करतात तसेच शाळा, महाविद्यालय, येथे जाऊन सुद्धा कायदेविषयक मार्गदर्शन केलेलं आहे व शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सुद्धा त्यांनी शेती विषयक वाद मध्यस्थीने व सामंजस्याने सोडवले आहेत त्यांच्या याच बहुआयामी कार्याची दखल घेऊन त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला आहे.

हे कृषी प्रदर्शन दिनांक १ मे ते ५ मे या कालावधीत संपन्न झाले यामध्ये कृषी उत्पादनांचे एकूण ३०० स्टॉल्स लावण्यात आले आहेत.भारतातील सर्वात मोठा सरडा (इग्वाना) हे या प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे.तज्ज्ञांची पीकविषयक चर्चासत्रे आणि सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उत्पादनांचे स्वतंत्र दालन येथे उपलब्ध आहे. एक दिवसीय पशु प्रदर्शन आणि डॉग शो चे देखील आयोजन करण्यात आले आहे. थेट उत्पादकांकडून ग्राहकांना विक्रीसाठी धान्य महोत्सव सुरू आहे.

या सोहळ्यास जिल्ह्यातून उपस्थित असंख्य शेतकरी बांधव तसेच विविध वृत्तपत्रांचे संपादक व पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक व मान्यवर हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन संयोजक महेश बेद्रे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या