तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात

इमेज
बारावीच्या विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला, प्रकृती चिंताजनक अंबाजोगाई: अंबाजोगाई येथील ट्युशन एरियात रात्री अभ्यासिका संपवून रूमवर परतणाऱ्या आशिष विनोद माने या १७ वर्षीय विद्यार्थ्यावर दुचाकीवरून आलेल्या तीन गुंडांनी भर रस्त्यावर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आशिषला उपचारासाठी लातूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे ट्युशन एरियातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.  पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष माने (वय १७, रा. रेपेवाडी, सध्या रा. माळीनगर, अंबाजोगाई) हा १२ वी सायन्सचा विद्यार्थी आहे. तो अंबाजोगाईत भाड्याने रूम घेऊन राहतो. बुधवारी (दि.१७) रात्री १२ वाजेच्या सुमारास तो परिसरातील एका अभ्यासिकेतून अभ्यास करून रूमवर पायी जात असताना हा प्रकार घडला. यावेळी दुचाकीवर आलेल्या साहिल मांदळे, जीतू मांद...

 परळी वैजनाथमध्ये जनक्षोभ; अल्पवयीन मुलींवरील अत्याचारा विरोधात परळीत ‘रास्ता रोको’





परळी वैजनाथ (प्रतिनिधी) राज्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचार आणि हत्येच्या वाढत्या घटनांच्या निषेधार्थ सोमवार दि. ४ मे रोजी परळी वैजनाथ येथील छत्रपती संभाजी महाराज चौक (ईटके कॉर्नर) येथे नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. पुण्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अमानवीय अत्याचार आणि हत्येच्या घटनेचे पडसाद आज परळीत उमटले असून, दोषींना तात्काळ फाशी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना महसूल प्रशासना मार्फत निवेदन देण्यात आले.

सकाळी ८ वाजेच्या सुमारास शहरातील मुख्य चौकात मोठ्या प्रमाणात नागरिक, महिला आणि तरुण एकत्र आले. आंदोलकांनी रस्त्यावर ठाण मांडल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. यावेळी आंदोलकांनी राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

          अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कोणत्याही परिस्थितीत दया न दाखवता भरचौकात फाशी द्यावी., प्रलंबित असलेला ‘शक्ती कायदा’ तात्काळ लागू करून अशा प्रकरणांची चौकशी ३० दिवसांत करून निकाल ९० दिवसांत लावण्यात यावा असा नवीन कायदा करावा., पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवावा., शहरात आणि ग्रामीण भागात महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस गस्त वाढवण्यात यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलनाची तीव्रता पाहता पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. अशा घटनांतील आरोपींना कठोर शासन व्हावे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे आश्वासन महसूल प्रशासन व पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, मागण्या मान्य न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या