ओंकारकडून शेतकऱ्यांच्या हातावर तुरी
अल्पवयीन मुलीचे अपहरण
आईवडील आजारी आज्जीला भेटायला जाताच केले अपहरण
केज:- केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत आई वडील आजारी आज्जीला भेटण्यासाठी गेले असताना एका अल्पवयीन मुलीचे आंतरजातीय विवाह करण्यासाठी अपहरण करण्यात आले आहे.
केज तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी ही शेजारच्या तालुक्याच्या ठिकाणी इयत्ता अकरावीच्या वर्गात शिकत असून तिचे आई वडील हे ४ मे रोजी सकाळी ८:०० वाजता तिच्या आजारी आजीला भेटायला तिच्या आजोळी गेले होते. ते परत घरी आल्यावर ही मुलगी गायब असल्याचे दिसून आले. कपाट उघडून पाहिले असता तिचे कपडे व बॅग दिसून आली नाही. मागील काही दिवसांपूर्वी सागर शंकर गरडे (रा. उंदरी) याच्यासोबत लग्न लावून देण्याची मागणी मुलीने आपल्या आईकडे केली होती. मात्र आईने तो वेगळ्या जातीचा असल्याचे सांगून त्याचा नाद सोडून देण्यास सांगितले होते. यावरून सागर गरडे याने मुलीला पळवून नेत तिचे अपहरण केल्याचा संशय असल्याने संबंधित मुलीच्या घरी जाऊन खात्री केली. मात्र त्याच्या घरी कोणी नसल्याचे व त्यांचे मोबाईल ही स्विच ऑफ असल्याचे दिसून आले. अशी तक्रार मुलीच्या वडिलांनी दिल्यावरून सागर गरडे विरुद्ध युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे हे करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा