परळीत दैनिक न्याय टाइम्सचा वर्धापन दिन उत्साहात

इमेज
शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रसारमाध्यमांनी करावे – दीपाताई मुधोळ-मुंडे शासन, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून प्रसारमाध्यमे कार्य करतात – पद्मश्रीताई धर्माधिकारी परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी वैजनाथ येथे दैनिक न्याय टाइम्सच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास सामाजिक न्याय विभागाच्या पुणे समाजकल्याण आयुक्त सौ. दीपाताई मुधोळ-मुंडे (IAS) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच परळीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, ज्येष्ठ नेते भास्कर चाटे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर, काँग्रेस नेते वसंत मुंडे, तसेच दैनिक न्याय टाइम्सचे संपादक बालकिशन सोनी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी संपादक बालकिशन सोनी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव ...

चर्चेत तोडगा नाही, आंदोलनावर ठाम

 महादेव कोळी, मल्हार कोळी प्रमाणपत्र व जात वैधता प्रश्नासाठी समाजबांधवांचे जिवघेण्या उन्हात तीन दिवसांपासून "अन्नत्याग आंदोलन"


आंदोलक आणि जात पडताळणी अधिकाऱ्यांमधील चर्चा निष्फळ, प्रश्न मार्गी लागेपर्यंत अन्नत्यागावर आंदोलक ठाम

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) मराठवाड्यातील महादेव कोळी, मल्हार कोळी बांधवांच्या प्रमाणपत्र व जात वैधता प्रश्नासाठी 8 समाजबांधवांनी जिवघेण्या उन्हात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. जात पडताळणी अधिकारी आणि आंदोलकांमध्ये आज चर्चा झाली मात्र ती निष्फळ ठरली. तर प्रश्न मार्गी लागेपर्यंत अन्नत्याग आंदोलन मागे घेणार नसल्याच्या भूमिकेवर आंदोलक ठाम आहेत. विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनात वेगवेगळ्या जिल्ह्यातील समाजबाधव सहभागी होत आहेत. आंदोलन सुरू असेपर्यंत समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ताकद दाखवून द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

     मराठवाड्यातील महादेव कोळी, मल्हार कोळी समाजाला सध्या जातीचे प्रमाणपत्र आणि वैधता प्राप्त करून घेण्यासाठी जीवाचे रान करावे लागते. एव्हढे करूनही यश मिळत नाही. महादेव कोळी मल्हार कोळी या समाजाला सहज जातीचे प्रमाणपत्र मिळून वैधता मिळावी या प्रमुख मागणीसाठी समाजातील 8 बांधवांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. भर उन्हाळ्यात छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर हे तीव्र आंदोलन तीन दिवसांपासून सुरू असुन रोज वेगवेगळ्या जिल्ह्यातील समाजबांधव सहभागी होत आहेत. काल सोमवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिवघेण्या उन्हात 8 जणांचा अन्नत्याग

     समाजाच्या अतिशय ज्वलंत प्रश्नांवर समाजातील 8 बांधवांनी जिवघेण्या उन्हात बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. चंद्रहंस नलमले - निलंगा, अच्युतराव सोगे - सोनपेठ, शंकरराव गंगाधरे - परळी वैजनाथ, सौ. रेणुकाताई घोरपडे - पूर्णा, रोहिदास एम्बलवाड - पालम, गजानन चंदेवाड - अहमदपूर, सुभाष कांबळे - कळंब, संदीप गवळे - सिल्लोड हे समाजबांधव रविवार दि. 3 मेपासून अन्नत्याग आंदोलनास बसले आहेत.  

    या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मराठवाड्यातील वेगवेगळ्या भागातील समाजबांधव मोठ्या संख्येने संभाजीनगरमध्ये दाखल होत आहेत. आज  5 मे मंगळवारी परभणी जिल्ह्यातील बांधवांनी आंदोलनात सहभाग नोंदविला. 

चर्चेत तोडगा नाही, आंदोलनावर ठाम

     दरम्यान आज मराठवाडा विभागातील चारही अनुसूचित जात पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी आणि अन्नत्याग उपोषणकर्ते, अभ्यासक  यांच्या सोबत सविस्तर चर्चा झाली. मराठवाड्यातील महादेव कोळी, मल्हार कोळी जमातीच्या पुराव्यांच्या बाबतीतही चर्चा झाली. पण तोडगा निघाला नाही. संशोधन अधिकारी आणि चारही सह आयुक्त यांच्यासोबत चर्चा करून आयुक्त पुणे आणि सचिव आदिवासी विभाग यांच्याकडे पत्रव्यवहार करून मार्गदर्शन मागून घेऊ असे उपोषण स्थळी जातपडताळणी समितीच्या अधिकारी यांनी आश्वासन दिले आहे. पण  उपोषणकर्त्यांनी जोपर्यंत प्रश्नावर तोडगा निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आणि पुढील दिवसात  ठरलेल्या नियोजनाप्रमाणे बाकीच्या जिल्ह्यातील (लातूर , नांदेड, बीड, धाराशिव, जालना आणि हिंगोली)बांधवांनी मोठ्या संख्येने उपोषण स्थळी येऊन पाठिंबा देण्याची आव्हान उपोषणकर्त्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या