इमेज
बीडच्या राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कारप्राप्त रोहन बहीरवर बालभारतीत धडा! बीड– पुरात वाहून जाणाऱ्या महिलेला स्वत:च्या जीवाची बाजी लावून वाचवण्यासारखे धाडस दाखवलेल्या बीडमधील रोहन रामचंद्र बहीर-पाटील या मुलावर बालभारतीच्या सहावीच्या पाठ्यपुस्तकात स्वतंत्रपणे एक धडा घेण्यात आला आहे. खुद्द रोहनचे कुटुंबीयही या संदर्भात अनभिज्ञ होते. बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात धडा घेतल्याची माहिती कालच (गुरुवारी, १८ जून) आम्हाला मिळाल्याचे रोहनचे वडील रामचंद्र बहीर यांनी सांगितले. बीड तालुक्यातील नवगण राजुरी येथील रहिवासी असलेल्या रोहन बहीर याने २६ सप्टेंबर २०२१ मध्ये छायाबाई गायकवाड या महिलेला डोंगरी नदीला आलेल्या पुरात वाहून जाण्यापासून वाचवले होते. त्यावेळी रोहन बहीर नवगण राजुरीतील गजानन विद्यालयात दहावीत शिक्षण घेत होता. रोहनच्या धाडसाचे त्यावेळी सर्वत्र कौतुक झाले, परंतु त्याच्या शौर्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली जावी, यासाठी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते डाॅ. संजय तांदळे यांनी पाठपुरावा केल्याचे सांगण्यात आले. रोहनला अगदीच कोवळ्या वयात म्हणजे पंधराव्या वर्षी दाखवलेल्या धाडसासाठी २०२३ साली पंतप्रधान राष्...

बँकेच्या प्रगतीचे कौतुक

वैद्यनाथ बँकेच्या प्रगतीचा ना. पंकजा मुंडे यांच्याकडून आढावा




बँकेच्या आर्थिक कामगिरीचे केले कौतुक ; एनपीए शुन्य टक्के तर एकूण नफा ८ कोटी

परळी वैजनाथ दि. ०२ --

लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या प्रेरणेने मराठवाड्‌यातील अग्रगण्य बँक असेलेल्या दि. वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. च्या कामकाजाचा व आर्थिक प्रगतीचा राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री तथा बँकेच्या  ना. पंकजाताई मुंडे यांनी आज बँकेची मार्गदर्शक या नात्याने आढावा घेतला.

   बँकेचे चेअरमन विनोद सामत, व्हा चेअरमन रमेश कराड व संचालक मंडळ व अधिका-यांनी यहबँकेच्या आर्थिक स्थितीबाबत सविस्तर माहिती सादर केली. ३१ मार्च २०२६ रोजी अखेर बँकेच्या ठेवी ६९६ कोटी असून एकूण कर्ज ४६५ कोटी, गुंतवणूक ३९६ कोटी, सी.आर.ए.आर. १८.१७ टक्के, निव्वळ एन.पी.ए. शून्य टक्के, एकूण नफा ८.०१ कोटी व निव्वळ नफा ४.०४ कोटी इतका आहे.

बँकेच्या प्रगतीचे कौतुक

-------

ना. पंकजाताई मुंडे यांनी बँकेच्या आर्थिक कामगिरीचे कौतुक करत, बँकेने वित्तीय शिस्त राखत प्रगती साधल्याचे नमूद केले. तसेच बँकेचे निव्वळ एन.पी.ए. शून्य टक्के केल्याने संचालक मंडळाचे अभिनंदन केले. तसेच यापुढे अजून एन.पी.ए. कमी करणे, कर्जवाटपावर प्रभावी नियंत्रण ठेवणे, ग्राहकाभिमुख सेवा अधिक सक्षम करण्याबाबत तसेच मोबाईल बँकिंग, यु.पी.आय. अशा सेवा तत्पर सुरु करणेबाबत मार्गदर्शन केले.

बँकेचे संचालक व अधिकारी यांनी बँकेची आर्थिक स्थिती अधिक मजबूत करण्यासाठी, पारदर्शकता वाढविण्यासाठी व ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवण्याचा विश्वास व्यक्त केला. बँकेच्या मार्गदर्शक  ना. पंकजाताई मुंडे, संचालिका व माजी खा. डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बँक भविष्यात आणखी प्रगतीपथावर नेऊ असे आश्वासन दिले.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या