ना. पंकजात मुंडे यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले निर्देश

इमेज
माझी वसुंधरा अभियानात लोकसहभाग वाढविण्यावर भर;हवामान कृती आराखड्याचा नियमित आढावा घ्या ना. पंकजात मुंडे यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले निर्देश मुंबई, दि. १९ : पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या *माझी वसुंधरा अभियान* आणि राज्य वातावरणीय बदल कक्षाच्या पुनर्रचनेसंदर्भात आज पर्यावरण वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी आढावा घेतला. युवक, विद्यार्थी, महिला आणि सामाजिक प्रभावकांचा (इन्फ्लुएन्सर्स) मोठ्या प्रमाणावर सहभाग वाढविण्यावर भर द्यावा. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हवामान कृती आराखड्यांवर नियमित चर्चा व्हावी तसेच मंत्रिमंडळ बैठकीत दरमहा हवामान बदल विषयाचा आढावा घेण्यासंदर्भात पुढाकार घेणार असल्याचे यावेळी श्रीमती मुंडे यांनी सांगितले. यावेळी विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव राहुल रेखावार, उपसचिव जॉय ठाकूर आदी उपस्थित होते. श्रीमती मुंडे म्हणाल्या की, माझी वसुंधरा अभियान अधिक प्रभावी करण्यासाठी ‘वसुंधरा रक्षक’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात यावी. या अभियानात युवक, विद्यार्थी, महिला आणि सामाजिक प्रभाव...

 जोयानबा मजाजोद्दीन इनामदार चे १२ वी परीक्षेत घवघवीत यश: महाविद्यालयातून तृतीय क्रमांक



परळी वै. (प्रतिनिधी):

     परळी वैजनाथ येथील सामाजिक कार्यकर्ते मजाजोद्दीन इनामदार यांची सुकन्या जोयानबा हिने बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून तिने महाविद्यालयातील तृतीय क्रमांक पटकावला आहे. तिच्या या घवघवीत यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

       इमदादूल उलूम उच्च माध्यमिक विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून शेख खाजा शेख महेताब व संस्थेचे सचिव सय्यद हनिफ सय्यद करिम व उपाध्यक्ष. शेख मुजफ्फर शेख महेबूब सह सचिव सय्यद इस्माईल सय्यद करीम, ताज खान अमीर खान, सय्यद हुसेन सय्यद करीम, सय्यद मुस्तफा सय्यद करीम ,अमजद अली जागीरदार , मुसा खान गुलाब खान, मोहम्मद रफीक मोहम्मद रज्जाक आदी उपस्थितीत होते. तसेच उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सय्यद वाजेद सय्यद कादर, प्रा. महेमूद सिद्दीकी, प्रा. सय्यद नईम, प्रा. सय्यद एकबाल इत्यादी उपस्थित होते. ङ्कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सय्यद ईकबाल यांनी केले. त्यानंतर एच.एस.सी.बोर्ड परीक्षेत उत्तुंग यश प्राप्त करत स्वतः सह संस्थेचे नावलौकिक करणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांचा यावेळी पालकांसह सत्कार करण्यात आला. कला शाखेतून यावर्षी सर्व प्रथम येण्याचा मान. आयेशा जावेद मनियार विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण होत ७८.६७% प्राप्त केला. तर द्वितीय नुरेसबा अब्दुल रहेमान. ७८.००% व तृतीय जोयानबा मजाजोद्दीन इनामदार ७४.६७ या विद्यार्थीनींचा सत्कार मंचावर उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. जोयानबा मजाजोद्दीन इनामदार हिने संपादन केलेल्या या यशाबद्दल तिचे व पालकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या