मुख्याधिकारी यांना लिहिले सविस्तर उत्तर......

इमेज
  सरस्वती नदी वाचवा; काँक्रीटीकरण नव्हे तर पुनर्जीवन करा — अश्विन मोगरकर यांचे परळी नगरपरिषदेला निवेदन परळी वैजनाथ : प्रतिनिधी  धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्व असलेल्या सरस्वती नदीच्या काँक्रीटीकरण प्रकल्पाविरोधात सामाजिक कार्यकर्ते अश्विन मोगरकर यांनी परळी वैजनाथ नगरपरिषदेला सविस्तर निवेदन देत हा प्रकल्प तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. नगरपरिषदेकडून दि. 30 एप्रिल 2026 रोजी देण्यात आलेल्या पत्राला उत्तर देताना मोगरकर यांनी म्हटले आहे की, सरस्वती नदी ही नैसर्गिक नदी असल्याचे तसेच ती पूर्वी बाराही महिने वाहत असल्याचे नगरपरिषदेकडून प्रथमच अधिकृतरीत्या मान्य करण्यात आले आहे. भूमी अभिलेख कार्यालयाकडे नदीची नैसर्गिक हद्द कायम करण्यासाठी मोजणीची मागणीही करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. निवेदनात नगरपरिषदेवर गंभीर आरोप करण्यात आले असून, नदीत थेट सांडपाणी व गटाराचे पाणी सोडले जात असल्यामुळे जलप्रदूषण प्रतिबंधक कायद्यांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच नदीपात्रातील अतिक्रमण रोखण्यात नगरपरिषद अपयशी ठरल्याचे सांगत, सरस्वती नदीपात्रात उभारण्यात आल...

परळी तालुका गोर सेनेची राज्यसरकार कडे मागणी

 एस.टी.आरक्षणासाठी नेमलेल्या समितीने  पाच महिन्यात केलेल्या कामाचा आढावा द्या-परळी तालुका गोर सेनेची राज्यसरकार कडे मागणी




परळी , प्रतिनिधी -

गेल्या वर्षी गोरबंजारा समाजाला एस.टी.प्रवर्गातून आरक्षण द्या,हैदराबाद गॅझेट लागू करा आदी मागण्यासाठी गोरबंजारा समाजाने महाराष्ट्रभर ५५ महामोर्चे काढले शिवाय गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा संदेश चव्हाण यांनी समृद्धी महामार्गावर हजारो गोर सनिक  उतरवून रास्ता रोको केला व नांदेड रेल्वे रोखण्याचा इशारा दिला होता मात्र राज्यसरकार न सकारात्मक चर्चा करण्यासाठी मुंबई येथे ४ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व बंजारा समाजातील शिष्टमंडळासोबत सविस्तर चर्चा झाली व एसटी आरक्षणासाठी उच्च न्यायालयाचे माजी  न्यायाधीश तहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास समिती नेमण्यात आली मात्र गेल्या पाच महिन्यात समितीन कोणती कामे केली, कोणत्या दिशेने अभ्यास सुरु केला आहे की अजून फक्त कागदापुरतीच समिती सिमित राहिली आहे हे कळत नसल्याने गोरबंजारा समाज आक्रमक झाला असून अभ्यास समितीने पाच महिन्यातील केलेली कामे गोरबंजारा समाजापुढे मांडावीत या मागणीसाठी गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वात आज राज्यभर ३०० पेक्षा अधिक जागेवर निवेदन देण्यात आले आहे. 

संपूर्ण भारतातील १४ करोड गोरबंजारा समाजाची जन्मापासून  तर मरेपर्यंत स्वतंत्र गोरधाटी असून आदीम सभ्यतेची संपूर्ण लक्षणे गोरबंजारा समाजात दिसतात देशातील अनेक राज्यात त्यांना यामुळेच एस.टी.प्रवर्गातून आरक्षण दिलेले आहे मात्र महाराष्ट्र राज्यात विमुक्त जाती अ प्रवर्गात सामावेश केलेला आहे.मात्र गोरबंजारा समाजाचे राहणीमान वागणूक, रुढी परंपर,विशिष्ट ठिकाणी तांडा करुन राहणे,गोरबोली, गोरधाटी, पेहराव,आर्थिक मागासलेपण,स्वभावातील लाजबुजरेपणा हे आदिम सभ्यतेची संपूर्ण लक्षणे गोरबंजारा समाजात दिसतात म्हणून त्यांना एसटी प्रवर्गाचा समांतर आरक्षण द्यावे ही गेल्या ७५ वर्षापासूनची मागणी आहे गेल्यावर्षी याच मागणीसाठी राज्यात ५५ पेक्षा अधिक लाखोच्या संख्येने महामोर्चे निघालेत.पाच युवकांनी आपले जिवन संपवून शहीद झालेत.अनेकांनी आमरण उपोषण केले, रास्ता रोको केले.मात्र सरकारने दखल घेतली नाही म्हणून गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा संदेश चव्हाण यांनी समृद्धी महामार्गावर हजारो गोर सैनिक उतरवून रास्ता रोखला तेव्हा सरकारने सकारात्मक चर्चा करण्यासाठी मुंबई येथे ४ नोव्हेंबर रोजी बंजारा शिष्टमंडळासोबत चर्चा केली व अभ्यास समिती उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास समिती नेमण्यात आली मात्र गेल्या पाच महिन्यात समितीने नेमके कशाचा अभ्यास केला, कोणत्या दिशेने केला, याबाबत समाजाला आजपर्यंत काहीच माहिती दिलेली नाही तेव्हा ही समिती केवळ कागदापुरतीच सिमित तर नाही ना अशी शंका गोरबंजारा समाजात निर्माण झाली असून अभ्यास समितीने आजपर्यंत नेमके काय काय केले हे समजून घेण्यासाठी गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकारी, तहसीलदार  व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदन देतांना गोरसेनेचे तालुकाध्यक्ष मा. विनोदभाऊ राठोड  गोरसेनेचे कार्यकर्ते प्रेम चव्हाण,रमेश चव्हाण सर ,बाळू राठोड संतोष जाधव विशाल चव्हाण सचिन पवारमोहन पवारदत्तात्र्य राठोड संतोष राठोड युवराज राठोड उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....