तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात

इमेज
बारावीच्या विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला, प्रकृती चिंताजनक अंबाजोगाई: अंबाजोगाई येथील ट्युशन एरियात रात्री अभ्यासिका संपवून रूमवर परतणाऱ्या आशिष विनोद माने या १७ वर्षीय विद्यार्थ्यावर दुचाकीवरून आलेल्या तीन गुंडांनी भर रस्त्यावर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आशिषला उपचारासाठी लातूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे ट्युशन एरियातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.  पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष माने (वय १७, रा. रेपेवाडी, सध्या रा. माळीनगर, अंबाजोगाई) हा १२ वी सायन्सचा विद्यार्थी आहे. तो अंबाजोगाईत भाड्याने रूम घेऊन राहतो. बुधवारी (दि.१७) रात्री १२ वाजेच्या सुमारास तो परिसरातील एका अभ्यासिकेतून अभ्यास करून रूमवर पायी जात असताना हा प्रकार घडला. यावेळी दुचाकीवर आलेल्या साहिल मांदळे, जीतू मांद...

 संघर्षातून यशाकडे: भांडी-धुणी करणाऱ्या माऊलीच्या लेकीची १२ वीच्या परीक्षेत मोठी झेप!

परळी वैजनाथ,प्रतिनिधी...

आईने दुसऱ्यांच्या घरी भांडी-धुणी करून काबाडकष्ट केले आणि मुलीनेही त्या कष्टाचे चीज करत १२ वीच्या परीक्षेत तब्बल ७८% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. परिस्थिती बेताची असली तरी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर मिळवलेल्या तनुजा रणदिवे या मुलीच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तनुजा ची आई पद्मिन तानाजी रणदिवे  गेल्या अनेक वर्षांपासून गणेशपार भागात धुणी-भांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. पतीच्या निधनानंतर व आर्थिक स्थिती हलाखीची असताना घराची संपूर्ण जबाबदारी आईच्या खांद्यावर होती. "माझ्या वाट्याला आलेले कष्ट माझ्या मुलीच्या वाट्याला येऊ नयेत," याच एका ध्येयाने या माऊलीने दिवसरात्र काम केले. परळी येथे हनुमान नगर येथे किरायाच्या घरात राहणाऱ्या व घरात अभ्यासासाठी वेगळी खोली नाही की महागडे क्लास लावण्याची सोय नव्हती. आई कामावर गेल्यावर घरची कामे आटपून ही मुलगी अभ्यासाला बसायची. रात्री उशिरा पर्यंत तिने चिकाटीने अभ्यास केला. कष्टाचे मोल जाणणाऱ्या तनुजाने अभ्यासात कधीही कसर सोडली नाही.

नुकत्याच जाहीर झालेल्या १२ वीच्या निकालात तिने कला शाखेतून ७८% गुण मिळवून सर्वांनाच थक्क केले. निकालाचे वृत्त समजताच आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले. "माझ्या मुलीने माझ्या कष्टाचं सोनं केलं," अशी भावना तिने व्यक्त केली.

तनुजा च्या यशानंतर आता तिला उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळवलेले हे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या