मुख्याधिकारी यांना लिहिले सविस्तर उत्तर......

इमेज
  सरस्वती नदी वाचवा; काँक्रीटीकरण नव्हे तर पुनर्जीवन करा — अश्विन मोगरकर यांचे परळी नगरपरिषदेला निवेदन परळी वैजनाथ : प्रतिनिधी  धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्व असलेल्या सरस्वती नदीच्या काँक्रीटीकरण प्रकल्पाविरोधात सामाजिक कार्यकर्ते अश्विन मोगरकर यांनी परळी वैजनाथ नगरपरिषदेला सविस्तर निवेदन देत हा प्रकल्प तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. नगरपरिषदेकडून दि. 30 एप्रिल 2026 रोजी देण्यात आलेल्या पत्राला उत्तर देताना मोगरकर यांनी म्हटले आहे की, सरस्वती नदी ही नैसर्गिक नदी असल्याचे तसेच ती पूर्वी बाराही महिने वाहत असल्याचे नगरपरिषदेकडून प्रथमच अधिकृतरीत्या मान्य करण्यात आले आहे. भूमी अभिलेख कार्यालयाकडे नदीची नैसर्गिक हद्द कायम करण्यासाठी मोजणीची मागणीही करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. निवेदनात नगरपरिषदेवर गंभीर आरोप करण्यात आले असून, नदीत थेट सांडपाणी व गटाराचे पाणी सोडले जात असल्यामुळे जलप्रदूषण प्रतिबंधक कायद्यांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच नदीपात्रातील अतिक्रमण रोखण्यात नगरपरिषद अपयशी ठरल्याचे सांगत, सरस्वती नदीपात्रात उभारण्यात आल...

 श्री शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन.. शनिवारी शोभायात्रा

परळी वैजनाथ दि.०७ (प्रतिनिधी)

        येथील शनिमंदिर देवस्थान ट्रस्ट च्यावतीने श्री शनैश्वर जन्मोत्सवा निमित्ताने विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन रविवार (दि.१०) ते शनिवार (दि.१६) करण्यात आले आहे. तर शनिवारी सायंकाळी सहा वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.

         येथे दरवर्षी शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर व सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांच्या प्रेरणेने अखंड शिवनाम सप्ताह, श्री.ग्रंथराज परमरस्य पारायण सोहळा आयोजित केला जातो. यावर्षी अखंड शिवनाम सप्ताहाची सुरुवात रविवारी (दि.१०) ते शनिवार (दि.१६) पर्यंत करण्यात आले आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शनिवारी (दि.१६) संध्याकाळी ७ वाजून ०४ मिनिटांनी शनैश्वर जन्मोत्सव साजरा होईल, यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी हा महाप्रसाद शनिमंदिर मध्ये होणार आहे.  त्याचबरोबर शनिवारी (दि.०९) सायंकाळी ५ वाजता शोभायात्रा हनुमान मंदिर मोंढा येथून राणी लक्ष्मीबाई टाँवर चौक मार्गे शनी मंदिरात काढण्यात येणार आहे. तसेच गुरुवारी (दि.१४) भव्य रक्तदान शिबीर सकाळी आठ ते अकरा यावेळेत आयोजित केले आहे. धार्मिक कार्यक्रमात रोज सकाळी शिवपाठ, परमरस्य पारायण, शनि महात्म्य पारायण, गाथा भजन, प्रवचन आदि कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या सर्व कार्यक्रमास पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष संगमेश्वर फुटके व श्री. शनिमंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....