तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात

इमेज
बारावीच्या विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला, प्रकृती चिंताजनक अंबाजोगाई: अंबाजोगाई येथील ट्युशन एरियात रात्री अभ्यासिका संपवून रूमवर परतणाऱ्या आशिष विनोद माने या १७ वर्षीय विद्यार्थ्यावर दुचाकीवरून आलेल्या तीन गुंडांनी भर रस्त्यावर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आशिषला उपचारासाठी लातूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे ट्युशन एरियातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.  पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष माने (वय १७, रा. रेपेवाडी, सध्या रा. माळीनगर, अंबाजोगाई) हा १२ वी सायन्सचा विद्यार्थी आहे. तो अंबाजोगाईत भाड्याने रूम घेऊन राहतो. बुधवारी (दि.१७) रात्री १२ वाजेच्या सुमारास तो परिसरातील एका अभ्यासिकेतून अभ्यास करून रूमवर पायी जात असताना हा प्रकार घडला. यावेळी दुचाकीवर आलेल्या साहिल मांदळे, जीतू मांद...

 पश्चिम बंगाल चा निकाल  भाजप कार्यकर्त्यांसाठी अत्यंत आनंददायी व उत्साह वाढवणारा - ना. पंकजा मुंडे




पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या कुशल रणनितीचा विजय

मुंबई दि. ०५---

पश्चिम बंगाल मध्ये झालेला दणदणीत विजय हा अत्यंत आनंददायी व देशभरातील तमाम भाजपा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविणारा आहे अशा शब्दात राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांचे सर्वमान्य, विकसनशील नेतृत्व आणि केंद्रीय गृहमंत्रीअमितभाई यांनी चाणक्याप्रमाणे केलेले फुलप्रूफ प्लॅनिंग त्यासमवेत भारतीय जनता पार्टीतील कार्यकर्त्यांचे अविरत कष्ट या सर्वांचे हे यश आहे. या सर्व यशाबद्दल सर्वांचे अभिनंदन आणि मनापासून आनंद व्यक्त करत आहे असं ना. पंकजाताई यांनी म्हटलं आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या