ना. पंकजात मुंडे यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले निर्देश

इमेज
माझी वसुंधरा अभियानात लोकसहभाग वाढविण्यावर भर;हवामान कृती आराखड्याचा नियमित आढावा घ्या ना. पंकजात मुंडे यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले निर्देश मुंबई, दि. १९ : पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या *माझी वसुंधरा अभियान* आणि राज्य वातावरणीय बदल कक्षाच्या पुनर्रचनेसंदर्भात आज पर्यावरण वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी आढावा घेतला. युवक, विद्यार्थी, महिला आणि सामाजिक प्रभावकांचा (इन्फ्लुएन्सर्स) मोठ्या प्रमाणावर सहभाग वाढविण्यावर भर द्यावा. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हवामान कृती आराखड्यांवर नियमित चर्चा व्हावी तसेच मंत्रिमंडळ बैठकीत दरमहा हवामान बदल विषयाचा आढावा घेण्यासंदर्भात पुढाकार घेणार असल्याचे यावेळी श्रीमती मुंडे यांनी सांगितले. यावेळी विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव राहुल रेखावार, उपसचिव जॉय ठाकूर आदी उपस्थित होते. श्रीमती मुंडे म्हणाल्या की, माझी वसुंधरा अभियान अधिक प्रभावी करण्यासाठी ‘वसुंधरा रक्षक’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात यावी. या अभियानात युवक, विद्यार्थी, महिला आणि सामाजिक प्रभाव...

विज्ञान शाखेतून स्नेहल लक्ष्मण अनंतपुरे तर कला शाखेतून शेख मसिरा मोईझ प्रथम

 लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाची बोर्ड परिक्षेत यशाची परंपरा कायम, विज्ञान शाखेचा १०० टक्के, तर कला शाखेचा ७६.८ टक्के 




विज्ञान शाखेतून स्नेहल लक्ष्मण अनंतपुरे तर कला शाखेतून शेख मसिरा मोईझ प्रथम 

परळी वैजनाथ दि.०२ (प्रतिनिधी)

        लक्ष्मीबाई देशमुख महिला कनिष्ठ महाविद्यालयाने १२ वी बोर्ड परिक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली असून महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतून स्नेहल अनंतपुरे तर कला शाखेतून शेख मसिरा मोईझ प्रथम आली आहे. याबदल प्राचार्या व संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

             शहरातील लक्ष्मीबाई देशमुख कनिष्ठ महिला महाविद्यालयाने बारावी बोर्ड परिक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली असून काँलेजचा निकाल ९२.८१ टक्के लागला आहे. महाविद्यालयातून विज्ञान शाखेची विद्यार्थिनी विज्ञान शाखेतून प्रथम स्नेहल लक्ष्मण अनंतपुरे (७९.६७), द्वितीय- शेख अनम सिराज (७४.५०), तृतीय- सय्यद झवेरिया अफसर (७३.८३) तर कला शाखेची विद्यार्थिनी शेख मसिरा मोईझ (७८.८३) प्रथम, द्वितीय शेख इशरत बेगम सलीम

 (७२.५०), तृतीय बालिका सोनेराव तांदळे (७२.१७) क्रमांक पटकावला आहे. कला शाखेतून एक विद्यार्थी विशेष प्राविण्य तर १६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेतून एक विद्यार्थी विशेष प्राविण्य तर ५८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत

 या यशाबद्दल संस्थेचे मार्गदर्शक अनिलराव देशमुख, अध्यक्ष संजय देशमुख, सचिव रविंद्र देशमुख, कोषाध्यक्ष प्रा प्रसाद देशमुख, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ विद्या देशपांडे, कनिष्ठ विभागाचे प्रा. प्रविण फुटके, प्रा प्रविण नव्हाडे, प्रा अशोक पवार, प्रा विशाल पौळ, प्रा आशिलता शिंदे, प्रा डॉ विना भांगे, प्रा आचार्य सह कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या