परळीत दैनिक न्याय टाइम्सचा वर्धापन दिन उत्साहात

इमेज
शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रसारमाध्यमांनी करावे – दीपाताई मुधोळ-मुंडे शासन, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून प्रसारमाध्यमे कार्य करतात – पद्मश्रीताई धर्माधिकारी परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी वैजनाथ येथे दैनिक न्याय टाइम्सच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास सामाजिक न्याय विभागाच्या पुणे समाजकल्याण आयुक्त सौ. दीपाताई मुधोळ-मुंडे (IAS) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच परळीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, ज्येष्ठ नेते भास्कर चाटे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर, काँग्रेस नेते वसंत मुंडे, तसेच दैनिक न्याय टाइम्सचे संपादक बालकिशन सोनी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी संपादक बालकिशन सोनी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव ...

 गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांनी चारित्र्य व सद्गुणही जोपासावेत





'वैद्यनाथ' च्या गुणवंत सत्कार समारंभात श्री दत्ताप्पा इटके      

परळी वैजनाथ,दि.५--

        जिद्द व परिश्रमातून मिळवलेली शैक्षणिक गुणवत्ता  ही व्यक्तिमत्त्वाच्या चौफेर विकासासाठी आधारभूत मानली जाते. पण त्याबरोबरच विद्यार्थ्यांनी आधुनिक युगात उत्तम चारित्र्य व सद्गुणांचीही जोपासना करावी, असे आवाहन जवाहर शिक्षण संस्थेचे सचिव श्री दत्ताप्पा इटके यांनी केले. 

          संस्थेच्या येथील  वैद्यनाथ महाविद्यालयात काल बारावी बोर्ड परीक्षेत विशेष विशेष प्राविण्य संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला . त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री इटके बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. व्ही. जगतकर हे होते. यावेळी माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर, उपप्राचार्य प्रा. डी. के. आंधळे , प्रा.हरीश मुंडे, प्राध्यापक प्रतिनिधी डॉ. पी. एल. कराड, पर्यवेक्षक डॉ. नयनकुमार आचार्य, समन्वयक यु.आर. कांदे, प्रा. एम. एल. देशमुख, प्रा डॉ एम. एन. रोडे त्यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

            यावेळी महाविद्यालयाच्या चारही विद्याशाखेतून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकांसह अन्य विशेष गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. प्रा. श्री एम. एल. देशमुख यांच्या वतीने सर्व शाखेतून प्रथम येणाऱ्या चि.शंतनु सुरेश मुंडे याचा सन्मान राशी देऊन विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कैवल्य कुलकर्णी, विनय गिरवलकर, सुंदर सोळंके, कु. साक्षी पाळवदे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. जगतकर यांनी विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण गुणवत्ता मिळवित भविष्यात देखील वैद्यनाथ महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवावा,  अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रास्ताविक  प्रा.यु.आर. कांदे यांनी, सूत्रसंचालन डॉ.नयनकमार आचार्य यांनी केले, तर आभार  उपप्राचार्य हरीश मुंडे यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या